प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
कोरोनाने सर्वत्र कहर केला आहे. हिंगोली जिल्ह्यात दररोज 200 ते 300 रूग्ण आढळत आहेत मात्र संचारबंदीत ही नागरिकांचा मुक्त संचार सुरूच आहे. त्यामुळे आज जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना त्यांच्या जबाबदारी ची जाणिव करून देण्यासाठी शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना अँटीजन टेस्ट सुरू केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री यांनी 1 मे पर्यंत कडक लाँकडाऊन चे आदेश दिले आहे. यामध्ये लाँकडाऊन काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र तरीही शहरात विनाकारण फिरणारांची संख्या वाढतच असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक पंडित कच्छवे यांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्या विरूद्ध धरपकड मोहीम सुरू करून आरोग्य विभागाच्या सहाय्याने नागरिकांची एँंटिजन टेस्ट सुरू केली आहे. आज शहरातील अग्रसेन चौकात कँम्प उभारून रस्त्यावर फिरणाऱ्या 30 नागरीकांची एँन्टिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 2 नागरीक कोरोना पाँझीटिव आढळले आहेत. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षकांच्या या अक्रमक भुमीकेने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. यामध्ये एका आमदारासह पत्रकारांची ही अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे.नागरिकांनी संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आव्हान पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.

COMMENTS