माजलगाव/प्रतिनिधी
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या निर्णयानुसार शासनाचा पुढील लॉक डाऊन डिक्लेर होई पर्यंत व्यापार पेठ उघडण्याचा निर्णय झाला होता पुढील प्रशासनाचे सर्व नियम पळून दुकान उघडण्यास परवानगी देण्यात यावी असे ही व्यापाऱ्यांत बोलले जात आहे.
नागरीकांच्या आरोग्या साठी आमचा लोकडाउन ला मुळीच विरोध नाही ,आम्ही सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत. परंतु १०० % लोकडाउन करा आम्ही प्रतिष्टाने बंद ठेवुन सहकार्य करु.नसता लोकडाउन आम्हाला मान्य नाही. ऑनलाईन व स्थानीक व्यापार्यांना समान संधी द्या तरच लोकडाउन मान्य करु.आम्ही शासनाला ७ दिवसांचा वेळ दीला परंतु निर्णय न झाल्याने नाईलाजास्तव आम्हाला आस्थापने उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला.
शासनाने आमच्या अडचणी समजुन घ्याव्या व सहकार्य करावे असे व्यापारी वर्गात बोलले जात आहे.
-------------------------------------------
माजलगाव शहरात अर्धे शटर उघडून दुकाने चालू आहेत तर काही ठिकाणी तर पूर्ण शटर उघडून खुलेआम गिराईक करत असताना दिसत आहे. शिवाजी चौकात काही दुकानदार कपड्याच्या दुकानी उघडून कपडे विकताना दिसत आहे प्रशासनाला दिसत नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
COMMENTS