केज प्रतिनिधी. केज: येथील निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी कांबळे यांच्या पत्नी सुमनताई यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मृत्यूसमयी त्यांच...
केज प्रतिनिधी.
केज: येथील निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी कांबळे यांच्या पत्नी सुमनताई यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 73 वर्षे होते. अत्यंत सामान्य परिस्थितीत सुमनताई यांनी घर सांभाळले.
त्यांनी आपल्या सुस्वभावाने मोठा नाते परिवार जोडला होता. आपल्या मुलांना व मुलींना शिक्षण देऊन मोठे करण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. शिवाजी कांबळे यांना आपली शिक्षण सेवा व घर सांभाळण्यात सुमनताई यांचे मोठे योगदान होते. केज येथील समर्थनगर चौथ्या गल्लीत त्यांचे वास्तव्य होते. वडवणी च्या गटविकास अधिकारी मीना जाधव कांबळे यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे केज शहरात हळहळ व्यक्त होतेय.

COMMENTS