केज (प्रतिनिधी) केज तालुक्यातील विविध भागात रस्ता मजबुतीकरणासाठी तब्बल २०० लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना जिल्हा नियोजन मंडळाच्या वार्षिक आराखड्यात मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.
निवडणुकीत दिलेल्या शब्दांची पूर्तता बजरंग सोनवणे करू लागले आहेत.
पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर होत असल्याचे दिसून येत आहे.
मंजूर रस्त्यांच्या कामांची नावे व निधी पुढीलप्रमाणे
१. चिंचोलीमाळी ते शिरपूरा रस्ता सुधारणा करणे . (२५.०० लक्ष )
२. सारणी आ. ते भाटूंबा रस्ता सुधारणा करणे . (२५.०० लक्ष )
३. भोपला ते आथर्डी रस्ता सुधारणा करणे . (२५.०० लक्ष )
४. वरपगाव ते कापरेवाडी रस्ता सुधारणा करणे . (२५.०० लक्ष )
५. युसूफ वडगाव ते सादोळा रस्ता सुधारणा करणे . (२५.०० लक्ष )
६.सातेफळ ते माळेगाव रस्ता सुधारणा करणे . (२५.०० लक्ष )
७.हादगाव वरपगाव ते बागेशपुरा ते महाराज मठ रस्ता सुधारणा करणे . (२५.०० लक्ष )
८. माळेगाव ते गव्हाणेवस्ती रस्ता सुधारणा करणे . (२५.०० लक्ष )

COMMENTS