धर्माबाद दि.7 (अहमद लड्डा) - महाराष्ट्रात दिवसागणिक वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णसंख्या आणि सर्वत्र पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा...
धर्माबाद दि.7 (अहमद लड्डा)
- महाराष्ट्रात दिवसागणिक वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णसंख्या आणि सर्वत्र पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन शालेय शिक्षण विभागाने याआधीच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे कुठलेही मूल्यमापन न करता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाच्या धर्तीवर इयत्ता नववी व अकरावी च्या विद्यार्थ्यांच्या देखील आरोग्याचा विचार करता या विद्यार्थ्यांना देखील पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एका पत्राद्वारे केली आहे. प्रा. दारमोड यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन केलेल्या मागणीला शैक्षणिक क्षेत्रातून पाठींबा मिळत आहे.

COMMENTS