सोनपेठ/प्रतिनिधी
○सोनपेठ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी नुकतीच निवड करण्यात आली.सदर निवड बिनविरोध करण्यात आली.विशेष म्हणजे अडीच वर्षांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांसह इतर पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्यात आली होती.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य निवडून येत सोनपेठ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आले होते.एका वर्षांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्याचा गाडा हकलला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दशरथ सूर्यवंशी-पाटील यांनी मनाचा उदारपणा दाखवत यापूर्वी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापती श्रीमती मीराबाई बाबुराव जाधव यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला होता जाधव यांनी राजीनामा देऊन पक्षादेश मानला मात्र आता सभापती कोण?असे प्रश्न उपस्थित होत असतानाच केवळ एक सदस्य संख्या असणाऱ्या शिवसेनेच्या आशा अरविंद बदाले यांची सभापतीपदावर आज १७ एप्रिल रोजी वर्णी लागली आहे.या निवडीबद्दल नवनिर्वाचित सभापती बदाले यांचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर,तालुकाध्यक्ष दशरथ सूर्यवंशी,लक्ष्मीकांत देशमुख,मदन भोसले,शिवाजी भोसले यांच्यासह शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.

COMMENTS