धर्माबाद (अहमद लड्डा)
धर्माबाद तालुक्यात महसूल विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षितपणाने नियमबाह्य रेती वाहतुकीने उच्छाद मांडला आहे उपरोक्त प्रकाराला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासन सपशेल अपयशी ठरले असल्याने मरगळ आलेल्या महसूल विभागाला वटणीवर आणण्यासाठी आता जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालून वठणीवर आणावे अशी प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांतुन होत आहे.
शहरासह ग्रामीण भागात ब्रेक द चैन अंतर्गत संचारबंदी असली तरी अवैधरित्या नियमबाह्य रेतीचा मुक्तसंचार दिवसरात्र चालूच असल्याने जिल्हाधिकारी यांचे नियम फक्त सर्वसामान्य लोकांवर कार्यवाही करण्यापुरतेच उरले का?असा प्रश्नही उपस्थित होत आह.
विशेष म्हणजे मागील दीड महिन्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या 62 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. पण महसूल च्या जाणीवपूर्वक दुर्लक्षितपणाने चालु असलेल्या नियमबाह्य रेती वाहतूकीविरुद्ध मात्र कार्यवाहीस कधी मुहूर्त मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेतीच्या धंद्यात लाखाची कमाई असल्याने काही शासकीय कर्मचाऱ्याच्या नातलगानी सुद्धा या धंद्यात पदार्पण केले असल्याने त्याबाबत उपविभागीय अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक कधी कार्यवाही करतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
मरगळलेल्या व्यवस्थेला वाटणीवर आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनीच वटणीवर आणावे अशी प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांतुन व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या वर्षी तालुक्यातील येलापूर ,चोंडी व संगम हे तीन वाळू घाट शासकीय लिलावासाठि उपलब्ध होते पण कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने लिलावाच्या प्रक्रिया रखडलेल्या आहेत. सरकारला महसूल वाढ करण्यासाठी वाळू घाट लिलावात काढावे लागते मात्र त्यापुर्वीच संगम सह इतर ठिकानाहून रेती उपसा होत असल्याने फुकटची मिळणारी वाळु लीलावातुन कोण घेईल हा एक प्रश्नच आहे.

COMMENTS