नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेतून घर बांधकाम करण्यासाठी पाच ब्रास पर्यंतची रेती कोणतेही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याचे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करून जिल्हाधिकारी व तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या असून आज पर्यंत घरकुल लाभधारकांना मोफत रेती मिळाली नाही तरी रेती अभावी काही लाभधारकांची संसार उघड्यावर पडले असून माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी तात्काळ रेती घरकुल लाभधारकांना मोफत देण्यात यावी रेतीचे भाव गगनाला भिडाल्यामुळे रेती विकत घेणे परवडत नाही पावसाळा जवळ येत असल्यामुळे त्यांना राहण्यासाठी घराचे बांधकाम करणे गरजेचे आहे तरी रेती मोफत देण्याचे नायगांव तहसीलदारांना आदेश काढून लवकरात लवकर देण्यात यावी तसेच मागील काही दिवसापूर्वी माननीय तहसीलदार नांदे मॅडम यांनी काही घरकुल लाभधारकांना रेती वाटप करण्यात आली होती माननीय तहसीलदार साहेब गजानन शिंदे यांच्याकडे बऱ्याच घरकुल लाभधारकांनी रेतीची मागणी करून सुद्धा रेती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे असे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांनी एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे अन्यथा भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नायगांव तहसील कार्यालयासमोर सर्व घरकुल लाभ धारकांना घेऊन उपोषणास बसण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS