नायगांव / प्रतिनिधी
नायागांव तालुक्यातील इंडिया मेगा ऍग्रो अनाज लिमिटेड कंपनी एम आय डी सी कृष्णूर या कंपनीने राज्यातील व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या भुईमुगाची खरीदी आता कंपनीचे मालक तथा चेरमन अजय बाहेती यांनी थेट कच्या हळदी बरोबर भुईमूगाची खरेदी करणार आहे
ग्रामीण भागातील शेतकऱ्यानी भुईमूगाच्या शेंगाचे ऑईल मिल मध्ये वेगवेगळी प्रक्रिया करून भुईमूगाच्या शेंगाचे टरफल व शेंगदाणा वेगवेगळे करणे. तसेच शेंगदाण्यापासून कच्चे तेल तयार करणे त्या कच्च्या तेलास रिफाईंड करून ते बाजारात विकणार असल्याचे संकेत मिळत आहे
तालुक्यातील इंडिया मेगा कंपनी ही अगोदर पासूनच सोयाबीन, ज्वारी, हरभरा, तसेच पक्की व कची हळद खरीदी केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याने शेतकरी आपल्या शेतातील माल कंपनीला थेट आणून विक्री करत आहेत काही दिवसातच भुईमूग पिकाची काढणी चालू होणार आहे
शेतकऱ्याचा माल खरीदी करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत मार्केट बंद असल्याने सदरचा माल शेतकऱ्याला घेऊन जाणे होत नाही व कमी भाव लागतो सदरच्या कंपनीने शेतकऱ्याच्या मालाला दर्जेदार भाव देऊन थेट भुईमूग पिकाची ही खरीदी करणार असल्याचे कंपनीच्या सूत्रानी सांगितले आहे.
शेतकऱ्यानी यंदा उन्हाळी भुईमूग पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली शेतकरी बांधवांनी भुईमूगाची काढणी झाल्याच्या नंतर इंडिया मेगा ऍग्रो कंपनीला द्यावेत व विक्री करावी आपल्या उत्पन्नात वाढझाली पाहिजे हा मुळ हेतु कंपनीचा असून शेतकऱ्यानी आपल्या शेतातल्या काळ्या मातीत अक्षरशः सोन पिकवित असतो त्या काळ्या मातीतील सोन्याला कंपनी दर्जेदार भाव देणार असल्याची चर्चा होत आहे.

COMMENTS