नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील वजीरगाव शिवारात हळद काढणी करत असतांना गावातील शेतकरी आनंद शंकर ढगे (वय ३५) याच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाल्याची दुर्घटना मंगळवारी दि. 13 एप्रिल सायंकाळी घडली.
मागील आठवडय़ा भरा पासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबडीने हळद काढणीला सुरुवात केली.मंगळवारी चार पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वारा पाऊस झाला होता. तालुक्यातील अनेक शेतकरी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत हळद काढणी शिजविण्यामध्ये व्यस्त होते. ढगाळ वातावरण असल्यामुळे काढलेली हळद जमा करण्यासाठी ढगे हे शेतात गेले असता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.यावेळी अचानक वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधितांकडून रितसर पंचनामा करून मृतदेह नायगांव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला होता. आनंद ढगे यांच्या पार्थिवावर वजिरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील,पत्नी मुले मुली,भाऊ बहिण,असा परिवार आहे.त्यांच्या अशा अपघाती निधनामुळे तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS