मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असुन या निवडणुकीत महाविकास आघाडीचे २१ पैकी १७ संचालक निवडून पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. दि.१६ एप्रिल शुक्रवार रोजी नांदेड येथे झालेल्या संचालकांचा विशेष बैठकीत पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी अध्यक्षपदाची माळ नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या गळ्यात घालताच मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे चव्हाण समर्थकांनी गावातील मुख्य रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी करत विजय जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी,श्री़धर पाटील बेटमोगरेकर,आबा देसाई,प्रविण पाटील,मुस्तफा पिंजारी,राम तळणे,रामदास मुदळे,लक्ष्मण पिटलेवाड,असलम दौलतबादी,नसरु सय्यद,अरुण खपाटे, बाबा पिंजारी, संदीप खपाटे,संदिप साडपल्ले ,चंद्रकांत भंडारी आदींची उपस्थिती होती
.


COMMENTS