*माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेते चंद्रकांत राठोड यांनी केली वचनपूर्ती*
सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ शहराच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेते चंद्रकांत राठोड यांनी कुटुंबासह स्वतःला वाहून घेतले असून चंद्रकांत राठोड यांनी शहरातील प्रत्येक नागरिक आणि घटकाची वचनपूर्ती करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला आहे.सोनपेठ शहरात भिमगड येथे नगर परिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य सभागृह उभारण्यात यावे,अशी मागणी अनेक दिवसापासुन येथील नागरीकांची होती.त्या मागणीची दखल घेवुन गटनेते माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी नगर परिषदेच्या गत पंचवार्षीक सार्वत्रिक निवडणूकीतील जाहिरनाम्यामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भव्य सभागृह उभारण्याचे वचन दिले होते.
त्या जाहीरनाम्याची पुर्तता म्हणून भिमगड येथे विजयादशमी,धम्मपरिवर्तन दिनाचे औचीत्य साधुन सभागृहाचे भुमीपुजन करण्यात आले होते.अवघ्या ५ महिन्यामध्ये सभागृहाचे बांधकाम पुर्ण झाले असून मराठवाड्यातील“क”वर्ग नगर परिषदेच्या धर्तीवर १०० फुट लांबी,५९ फुट रूंदी व तब्बल ३० फुट उंचीचे भव्य सभामंडपाचे बांधकाम पुर्ण करून नागरीकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दि.१४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील नागरीकांसाठी खुले करण्यात आले.या सभागृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके,नगरसेवक शरद बनसोडे,उत्तम भाग्यवंत,मारोती रंजवे,लक्ष्मीकांत कांदे,लक्ष्मण खरात,निलेश राठोड,बबन तिरमले,विलास भाग्यवंत आदी उपस्थीत होते,यावेळी उपस्थितांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
*प्रतिक्रीया,*
*भीमगड येथील माता भगीनी,युवक,नागरीकांची अनेक वर्षापासुन मागणी होती,मागणीची वचनपुर्ती करत नगर परिषदेने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम पुर्ण करून भीमगडच्या नागरीकांचे स्वप्न पुर्ण केले आहे.शहरातील सोमेश्वर सभामंडप,अहिल्याबाई होळकर सभागृह,शादीखाना येथे सभामंडप आदी कामे पूर्णत्वाकडे करण्यात आली असून आगामी काळात सोनखेड येथे संत भगवानबाबा सभागृह,मुस्लिम समाजासाठी शादीखाना,भोई समाजासाठी सभागृह,शहरातील शादीखाना जवळ जनाजची नमाज अदा करण्यासाठी हॉल उभारण्याचा मानस असून तेही काम लवकरच नगरपरिषदेच्या वतीने पूर्ण करण्यात येईल शहराच्या विकासासाठी जे-जे काम शक्य असेल ते-ते सर्व कामे यापुढील काळात करण्याचा आमचा मानस असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष तथा सभागृह नेते चंद्रकांत राठोड यांनी दिली.*

COMMENTS