मालेगाव येथील कोविड सेंटरला आज जिल्हाधिकारी डाॅ.विपिन इटनकर यांनी भेट देऊन सर्व सोयीसुविधांची पाहणी करुन उपयुक्त मार्गदर्शन केले.
या अद्ययावत कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकार्यांसह सर्व कर्मचारीवर्ग रुजु झाला आहे.
सर्व मान्यवर पाहुणे व रुजु झालेल्या वैद्यकीय कर्मचार्यांचे मालेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल इंगोले,उपसरपंच मनोहर खंदारे तसेच ईश्वर पाटील यांनी स्वागत केले.
तहसिलदार सुजित नरहरे,वैद्यकीय अधिकारी डाॅ.धनगे,तलाठी पाटील,नागोराव वाघमारे,शे.एकबाल यांची आज प्रमुख उपस्थिती लाभली.
सोमवारपासून कोविड सेंटर नियमितपणे रुग्णांच्या सेवेत रुजु होत आहे.येत्या काही दिवसातच आॅक्सीजन सुविधाही उपलब्ध होणार आहे.
सरपंच अनिल इंगोले यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी डाॅ.इटनकर यांचे कोविड सेंटरची मागणी तत्परतेने पूर्ण केल्याबद्दल आभार मानून या केंद्रास ग्रामपंचायतमार्फत संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.परिसरातील कोरोना रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

COMMENTS