#निवघा(बाजार) बालू पाटील धानोरा
ता.हदगाव जि. नांदेड निवघा गावा मध्ये प्रत्येक नागरिकांना घरोघरी जाऊन कोवीड विषयी जनजागृती करत आहोत प्रत्येकाला सांगत आहे की सर्दी खोकला ताप कुठलेहि आजार अंगावर काढू नका त्वरीत जाऊन दवाखान्यामध्ये दाखवा हे सर्व उपाययोजना केला तरच आपण कोविडला हरवू शकतो.... गावांमध्ये जनजागृती करताना गावातील प्रतिष्ठित नागरिक दिसत आहेत
#निवघा ग्रामपंचायतच्या वतीने लसीकरण जनजागृती करताना पैनल प्रमुख मधुकरराव जी कदम पाटील साहेब
#सरपंच शरद पाटील उपसरपंच श्याम पाटील* डॉ सचिन साहेब डॉ कदम साहेब ग्रामपंचायत सदस्य व #मधुकररावजी_कदम_पाटील अंगणवाडी सेविका लसीकरण करा जीवन वाचवा
पैनल प्रमुख मधुकरराव जी कदम पाटील यांची निवघा बाजार वासीयाना आवाहन
आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये सध्या कोरोनाची तपासणी चालू आहे, तरी गावातील सर्व व्यापारी व सामान्य नागरिकांनी आपापली कोरोनाची तपासणी करून घ्यावी ज्यामुळे आपल्या मनातील शंका दूर होईल.माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की थोडी फार जरी सर्दी, ताप खोकला,तोंडाला चव न येणे घसा दुखणे, taifaid सारखे जराही लक्षण वाटतं असतील तर लगेच आपली तपासणी करून घ्या.
माझी आपणास कळकळीची विनंती आहे की आपल्या मुळे आपल्या घरातील लहान मुले, वयस्कर माणसे यांना आपल्या पासून हा कोरोणाचा धोका होऊ द्यायचा नसेल तर कृपया करून आपण स्वतःहून ही कोरोनाची तपासणी करून घ्या.ज्यातून आपण स्वतःचे व कुटुंबातील सर्व सदस्यांचे या कोरोणा पासून रक्षण करू शकू.
अन्यथा आपल्याला फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल हे नक्की.
म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो काळजी घ्या तपासणी करा व
सर्व गावकऱ्यांनी ही कोरोनाची लस घ्या ही विनंती.
🙏रामकृष्ण हरी🙏
आपला
मधुकर सोणबाराव कदम


COMMENTS