नगर परिषदेतील कोट्यावधी रुपयांच्या कामाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी यांनी केली समिती गठीत

■ रिपब्लिकन पक्षाचे विजयदादा साळवे यांच्या निवेदनाची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल ■उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह ७ आधिकारी व कर्मचाऱ...

■ रिपब्लिकन पक्षाचे विजयदादा साळवे यांच्या निवेदनाची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल

■उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह ७ आधिकारी व कर्मचाऱ्यांचा समितीत समावेश

■ माजलगाव/प्रतिनिधी   ■

     येथील न.प.च्या वतिने दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कोट्यवधी रुपयांची ३३ कामाची बिले कामे न करताचा निधी हाडप केल्याने रिपब्लिकन स्वाभिमानी पक्षाच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष विजय साळवे यांनी जिल्हाधिकारी यांना याप्रकरणी चौकशी समिती नेमून संबधितावर.अँट्रासिटी अँक्टसह गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती,त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार वैशाली पाटील यांच्यासह ७ अधिकारी व कर्मचारी असलेली समिती न.प.तील कोट्यवधी रुपयांच्या कामाची चौकशी करणार असल्याने कामे न करता दलित वस्तीचा निधी हाडप करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

 यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी यांनी दि ०५ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात असे नमुद केले आहे की दि १२ मार्च रोजी तक्रारदार श्री विजयदादा साळवे , मराठवाडा प्रदेशाध्यक्ष स्वा.रि.प तथा नगरसेवक यांनी माजलगांव नगर परिषद कार्यालयात नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत झालेल्या कोटयवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी समिती मार्फत सखोल चौकशी करुन संबंधीत गुन्हेगारांविरुध्द अँट्रॉसिटी अँक्टसह योग्य गुन्हे दाखल करुन कटोर शासन करणे बाबत,तसेच तालुक्यातील छत्रबोरगांव येथील विठ्ठल मंदिराच्या जमीनीची बेकायदा खरेदी-विक्री करणाऱ्या ट्रस्टची व भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुध्द योग्य ती कार्यवाही करणेबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय बीड तसेच उपविभागीय कार्यालयास प्राप्त झालेले आहे,सदर निवेदनाचे अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी बीड यांनी प्रकरणात चौकशी करुन अहवाल तातडीने सादर करण्यास निर्देश दिलेले आहेत. त्याअर्थी उपरोक्त नमुद तक्रारी निवेदनाची अनुषंगाने सविस्तर चौकशी करणेकामी खालीलप्रमाणे चौकशी समितीची नियुक्ती करण्यात येत आहे. चौकशी कामी नियुक्त समितीत समिती अध्यक्ष माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे,समिती सचिव तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील, सदस्य मुख्याधिकारी , न.प.धारुर सदस्य,श्री निळेकर एव्ही.नायब तहसिलदार उपविभागीय आधिकारी कार्यालय माजलगांव, सदस्य श्री सरदेशमुख उप कोषागार अधिकारी वडवणी,सदस्य उप अधिक्षक,भूमी अभिलेख कार्यालय,श्री विष्णू भाबड,सदस्य श्री धोंगडे,शाखा अभियंता जि.प.बांधकाम,सदस्य  वि.रा.दिवटे,सहाय्यक माजलगांव,श्री गणेश जवादे सहाय्यक माजलगांव वरिलप्रमाणे नियुक्त चौकशी समितीने तक्रारी निवेदनातील नमुद सर्व मुद्यांचे अनुषंगाने सविस्तर आवश्यक त्या पध्दतीने चौकशी करावी व वस्तुनिष्ट चौकशी अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तयार करुन मा.जिल्हाधिकारी बीड यांना विनाविलंब सादर करावा.सदर आदेशाची अंमलबजावणी तातडीने अनुसरावी असे उपविभागीय अधिकारी माजलगाव यांनी आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group