स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पुनर्मूल्यांकनासाठी बेंगलोर येथून पाच सदस्यीय नॅक पिअर समिती दि. ०८ ते १० एप्रिल दरम्यान आलेली होती. तीन दिवसाच्या व्यस्त कार्यक्रमानंतर आज दि.१० एप्रिल रोजी शेवटची एक्झिट मीटिंग म्हणजेच समारोपाची बैठक घेऊन नॅक समितीने ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या विकासावर समाधान व्यक्त करत विद्यापीठातून घेतली एक्झिट.
यावेळी व्यासपीठावर नॅक समितीचे अध्यक्ष डॉ. गोपालकुमार क्षेत्री, समन्वयक डॉ. गौरीश नाईक, सदस्य डॉ. लक्ष्मी सरकार, सदस्य डॉ. नागेश्वरराव, सदस्य डॉ. गुलशन बसंल, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे आणि नॅक समन्वयक डॉ. डी.डी. पवार यांची उपस्थिती होती.
गेली पाच वर्षात विद्यापीठाने काय विकास साधला याचे बारकाईने मूल्यांकन करण्यासाठी नॅक समिती आलेली होती. कोव्हीड-१९ सारख्या महामारीतून जिल्हा जात असताना देखील सर्व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोतोपरी माहिती या समितीसमोर सादर केली. समितीनेही तेवढ्याच उत्साहाने प्रत्येक बाब बारकाईने पाहिली. विद्यापीठातील प्रत्येक विभागासह काही संकुलास त्यांनी भेट दिली. प्रत्येक घटकांशी चर्चा केली. चर्चेद्वारे त्यांच्या अडीअडचणी समजावुन घेतल्या. विद्यापीठावर असलेल्या सर्व प्राधिकरणाची त्यांनी भेटी घेतल्या. विद्यापीठाने सादर केलेल्या सर्व बाबी त्यांनी पुराव्यासहित तपासल्या विद्यार्थ्यांच्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांशी सखोल चर्चा केली. तीन दिवसाच्या या त्यांच्या भेटीनंतर आज शेवटी एक्झिट मिटिंगमध्ये विद्यापीठाने केलेल्या गेली पाच वर्षातल्या विकासावर समाधान व्यक्त केले. कोव्हीड-१९ विषाणूच्या प्रादुर्भाव देशभर जाणवत असतांनाही या नॅक पिअर समितीने नांदेडमध्ये येऊन तीन दिवस राहून विद्यापीठाचे पुनर्मूल्यांकन केल्याबदल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी यावेळी समितीचे आभार मानले. नॅक पिअर समितीमधील अध्यक्ष डॉ. गोपाल कुमार यांनी विद्यापीठातील सर्वांनी केकेल्या सर्वोपतरी सहकार्या बदल विद्यापीठाचे आभार मानले.
या दरम्यान विद्यापीठातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले. प्रत्येकांना नेमून दिलेली जबाबदारी प्रत्येकाने यशस्वीरित्या पार पडली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिन्ह बिसेन, नॅक समन्वयक डॉ. डी. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच समीत्यांनी कोव्हीड-१९ नियमाचे पालन करून आपापल्या जबाबदाऱ्या पार पडल्या. आजचा समारोप कार्यक्रम म्हणजेच एक्झीट बैठकीमध्ये नॅक पिअर समितीने तयार केलेला त्यांचा अहवाल राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडे पाठविला. आता सर्व विद्यापीठ वाट बघतेय ती त्या श्रेणीची, चांगलीच श्रेणी मिळेल अशी अपेक्षा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केली.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीमध्ये विद्यापीठातील संचालक, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभारप्रदर्शन प्रा. निना गोगटे यांनी केले.

COMMENTS