नायगाव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
तालुक्यातील बळेगाव येथे कोरोना आव्हानातही अवैधरित्या चोरटया मार्गाने देशी दारूची विक्री करत असल्याची गुप्त माहिती कुंटूर पोलिसांना प्राप्त होताच दिनांक २१ एप्रिल रोजीच्या सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास छापा मारून २७०४ रुपयाची देशी दारू जप्त करून तीन दारू विक्रेत्यांवर सिंघम स.पो.नि.करीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि नायगांव तालुक्यातील कुंटूर पासून जवळच असलेल्या बळेगाव येथे चोरटया मार्गाने देशी दारूची विक्री करत असल्याची गुप्त माहिती कुंटूर पोलिसांना प्राप्त होताच सिंघम सपोनि करीम पठाण ,उपनिरीक्षक दिनेश येवले ,पोहेकॉ.शंकर बुद्धवाड, पोकॉ.विवेक ईश्वरे , चालक रामेश्वर पाटील, होमगार्ड बेलकर ,यश कालेवार यांनी बाळेगावं येथे धाव घेऊन सरस्वती किराणा जनरल स्टोअर्स व शिवसाई धाब्याच्या बाजूला व्यंकट पा.बेलकर यांच्या शेतात भगवान बेलकर हे अवैधरित्या देशी दारू विकत असताना मिळून आल्याने त्यांचे ताब्यातून देशी दारूच्या ५२ सीलबंद बाटल्या मिळून आल्या तर दुसऱ्या कारवाईत बाबाराव वाघमारे ,संतोष वाघमारे रा.बळेगाव यांचे ताब्यातुन ३३ देशी दारूच्या शिलबंद बॉटल्या मिळून आल्या तर या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आलेल्या देशी दारू ज्याची किंमत २७०४ रुपये चा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून विना परवाना बेकायदेशीर देशी दारूची विक्री करीत असताना मिळून आल्याने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) ८३ प्रमाणे कर्तव्यदक्ष सपोनि.करीमखान पठाण व पोउपनि. दिनेश येवले यांच्या फिर्यादीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुनिल गटलेवार हे करीत आहेत.कुंटूर पोलिसांच्या धाडशी कारवाईमुळे दारू विक्रेत्याचे धाबे दणाणले आहेत.
COMMENTS