नांदेड. (प्रतिनिधी) हदगाव तालुक्यातील वानवाडी येथील जेष्ठ नागरिक त्र्यंबकअप्पा गणपतीअप्पा निमडगे (वय-६८वर्षे) यांचे अल्पशा आजाराने २६ एप्रिल...
नांदेड. (प्रतिनिधी) हदगाव तालुक्यातील वानवाडी येथील जेष्ठ नागरिक त्र्यंबकअप्पा गणपतीअप्पा निमडगे (वय-६८वर्षे) यांचे अल्पशा आजाराने २६ एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. दिवंगत त्र्यंबकअप्पा निमडगे यांच्या पार्थिव देहावर सोमवारी दुपारी हदगाव तालुक्यातील वानवाडी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, दोन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. पुणे येथील अभियंता दिनेश निमडगे यांचे 'ते' वडील, तर नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील सामाजिक कार्यकर्ते तथा कपड्याचे व्यापारी विनायक उर्फ गजू गंजगाळे यांचे 'ते' मामा होत.

COMMENTS