सोनपेठ (प्रतिनिधी) येथील सोनखेड रोड सेवालाल महाराज चौकाच्या आसपास कडबा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला दि. ६ एप्रिल रोजी आग लागल्याने मोठा बाका प्रसंग उद्भवला. त्यांनतर स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेत तत्काळ संपर्क केला असता अग्निशमन दलाची गाडी येऊ शकत नाही कारण कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने त्यांनी अघोषित असहकार सुरू केला आहे असे उत्तर नागरिकांना संबंधितांनी दिले.
यावर सामाजिक कार्यकर्ते सुमित बळीराम पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया देत "नगर परिषदेने सोन्याची पेठ असलेल्या गावांला आगीच्या संकटात टाकू नये" असे म्हंटले आहे. नगर पालिकेने त्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन द्यावे जेणेकरून ते मन लावून कामावर परत येतील व नागरिकांना दिलासा मिळेल.
जर का नगर परिषदेने याविषयी त्वरित कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही ईशारा सुमित बळीराम पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

COMMENTS