केज /प्रतिनिधी.
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या उञेश्वर पिंपरी येथील आरोग्य उपकेंद्रात कोव्हीड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लोकप्रतिनिधी व आरोग्य केंद्रातील आधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला . आरोग्य विभागाने कोव्हीड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य केंद्रासह उपकेंद्रात देखील कोरोना प्रतिबंधक लस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
या उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या काळेगाव घाट, केळगाव - बेलगाव बोरगाव, आरणगाव सह इतर गावातील ४५ पेक्षा जास्त वय वर्षे असणाऱ्या २६०नागरिकांनी या केंद्रात कोव्हीड लसीकरणाचा लाभ घेतला. आरोग्य केंद्रातील डॉ. आसाराम चौरे,डॉ. महादेव सांगळे,डॉ. अमोल गलांडे,चंद्रसेन खाडे, महादेव मस्के यांच्या आवाहनाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
कोवीड लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य केंद्रातील कर्मचारी व आशा वर्कर् यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS