पालावरील गरीब कुटूंबाना जळगावहून मदतीचा हात उपजिल्हाधिकारी विनय गोसावींनी 14 कुटूंबाना किराणा किट दिल्या

माजलगाव/भास्कर गिरी      राष्ट्रीय महामार्गावर फुले पिंपळगाव शिवारात पालावर राहणाऱ्या भिक्षुकी मागणाऱ्या गोसावी समाजावर लॉक डाऊन व गावबंदी म...



माजलगाव/भास्कर गिरी

     राष्ट्रीय महामार्गावर फुले पिंपळगाव शिवारात पालावर राहणाऱ्या भिक्षुकी मागणाऱ्या गोसावी समाजावर लॉक डाऊन व गावबंदी मुळे उपासमारीची वेळ आली असताना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल चे उपजिल्हाधिकारी विनय गोसावी यांनी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार भास्कर गिरी यांच्या मार्फत 14 कुटूंबाना महिनाभर पुरेल एवढा किराणा वाटप केला आहे.आणखी 26 कुटूंबाना किराणाकिट ची आवश्यकता असून  यांच्याकरिता दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.

    महाराष्ट्रात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने माजलगाव तालुक्यातील पाला वर राहणारे औंढा व हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असणारे गरीब गोसावी समाजाचे कुटूंब खेडोपाडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असतात.मात्र सध्या वाढत्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव व लॉक डाऊन मुळे गावबंदी केल्याने भिक्षा बंद झाली आहे. तर त्यांच्यवर उपासमारीची वेळ आली हे माहीत होताच जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे उपजिल्हाधिकारी असणारे विनय गोसावी यांना माहिती मिळतच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार भास्कर गिरी यांना फोनवर संपर्क करून पाला वर राहणारे गोसावी समाजाची माहिती घेतली याबाबत माजलगाव च्या तहसीलदार वैशाली पाटील यांना संपर्क करून दानशूर व्यक्तीकडून त्यांना मदत मिळवून देण्यास सांगितले मात्र तहसीलदार वैशाली पाटील यांनी असमर्थता दर्शवली. यानंतर कसलाच विलंब न लावता विनय गोसावी यांनी लगेच किरणा किट ची व्यवस्था करून आज दि. 29 एप्रिल रोजी दुपारी माजलगाव येथे 14 कुटुंबाना किराणा किट भास्कर गिरी याना वाटप करण्यास सांगितले.भास्कर गिरी यांनी सहकारी पत्रकार पुरुषोत्तम करवा, महराष्ट्र रराज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष उमेश जेथलिया,प्रा सुदर्शन स्वामी,रविकांत उघडे,विजय मके यांना सोबत घेऊन तात्काळ किराणा किट चे वाटप केले आहे. ही सर्व मदत विनय गोसावी यांनी केली

माजलगावचे दानशूर कोरोना योद्धे कुठे?

    मागील वर्षी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी संपर्क साधून अनेकां मार्फत किराणा वाटप,अन्नदान उपक्रम राबवले होते मात्र यावर्षी एक ही दानशूर,कोरोना योद्धा पालवरील उपासमारीची बातमी आल्यावर पुढे आले नाही


 तहसीलदार मॅडम शिवभोजन थाळी तरी द्या

  शहरात 2-3 ठिकाणी चालू असणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्रातील थाळी नेमकी जाते कुठे हा प्रश्न असून तहसीलदार वैशाली पाटील यांनी या 14 कुटुंबातील व्यक्तीची शिवभोजन थाळीची व्यवस्था तरी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


चौकट

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे भिक्षा ला जात येत नाही म्हणून ही तर तात्काळ मद्दत आहे. आणखी कोणी राहिले असेल त्यांना ही किराणा किट देऊ मदत करू 


विनय गोसावी 

उपजिल्हाधिकारी, एरंडोल जिल्हा जळगाव

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group