वाढदिवसाचा खर्च टाळून भगवान कांबळे यांनी रुग्णालयातील रुग्णांना केले खिचडीचे वाटप

धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद येथिल युवा कार्यकर्ते भगवान कांबळे मित्र मंडळी च्या वतीने सामाजीक कार्यकर्ता तथ निर्भीड निपक्ष रोखठोक पत्रकार...




धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद येथिल युवा कार्यकर्ते भगवान कांबळे मित्र मंडळी च्या वतीने सामाजीक कार्यकर्ता तथ निर्भीड निपक्ष रोखठोक पत्रकार भगवान शंकरराव कांबळे यांचा वाढदिवस एकदम साधेपणाने साजरा करत वाढदिवसावर होणारा खर्च टाळुन ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना व नातेवाईकांना खिचडी वाटप केले. व फुलेनगर येथील एका गरीब व्यक्ती चा मृत्यू झाला होता तरी त्या मृत्य पावलेल्या व्यक्ती च्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे तरी त्या घरातील एका व्यक्ती चा भगवान कांबळे यांना फोन आला पैशाची आडचण आहे अंत्यसंस्कार कसे करावे हे समज नाही आसे मनाले तर लगेच भगवान कांबळे यांनी त्याचं ठिकाणी अंत्यविधीवर खर्च करण्यासाठी बंद लिफापा दिला व मृत्यू पावलेल्या व्यक्ती चा अंत्यसंस्कार झाले वाढदिवसावर होणारा खर्च टाळून भगवान कांबळे यांनी त्या कुटुंबातील लोकांना सहकार्य केल्याबद्दल फुलेनगर व धर्माबाद शहरात भगवान कांबळे यांचे कौतुक होत आहे. भगवान कांबळे हे गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात कोणाच्याही सुखा दुःखात सहभागी होतात. गत वर्षी लाॅकडाऊन च्या काळात एका गरीब मुलाचा अपघातात पाय मोडला होता त्यावेळी देखील भगवान कांबळे यांनी धर्माबाद शहरातील जनतेला सोशलमिडीया वरुन गरीब मुलाचा पाय मोडला आहे आसे आव्हान केले होते तेव्हा त्यांच्या आव्हानाला काही दानशुर लोकांनी जवळपास ३८ हजार रुपये जमा करून दिले होते व ते पैसे घेउन नांदेड येथील खासगी रुग्णालयात त्या मुलाचे ऑपरेशन करून आणले होते. तसेच मुस्लिम समाजा चा पवित्र महिना हा रमजान चा आसतो त्या वेळी भगवान कांबळे मित्र मंडळी नी विचार केला कि जर आपण जे गरीब आहेत त्या लोकांना पहाटे (सहेरी)चे जर जेवण दिल तर कसे राहील यावर मित्र मंडळी नी विचार करून आप -आपसातले काही रुपये गोळा करून जेवण बनवण्याचे ठरले मग दररोज रात्री स्वयंपाक करून त्याचं पाकीट करून सकाळी चार वाजेपर्यंत मित्र मंडळी वाटप करत होते. व भगवान कांबळे मित्र मंडळी यांनी एक कल्पना केली कि धर्माबाद ग्रामीण रुग्णालयत रुग्णवाहिका नाही म्हणून ना नफा ना तोटा या तत्वावर चालवण्यासाठी इको ऑबुलंस आणली ज्या रुग्णवाहिकेचे लोकाअर्पण नांदेड भुसंपादन अधिकारी डाॅ सचिन खल्लाळ साहेब यांच्या हास्ते करण्यात आले होते. आसे अनेक कार्यक्रम शहरात भगवान कांबळे मित्र मंडळी च्या वतीने राबवली जातात, सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणुची परिस्थिती लक्षात घेऊन धर्माबाद येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान कांबळे यांचा वाढदिवस साजरा करण्याचे  टाळत मित्रमंडळा च्यावतीने ग्रामीण रुग्णालय रुग्ण व नातेवाईकांना खिचड़ीचे वाटप करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी वेणुगोपाल पंडीत साहेब धर्माबाद पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाटील आलुरकर, उपाध्यक्ष सतीश पाटील शिंदे ,संपादक संजय गायकवाड, गंगाधर अलुरोड,अब्दुल खदीर, शाकेर मोखांडीकर, शेख रईस, शेख मोईन, शेख सलमान सतीश सोनकांबळे, सद्दाम खान, फेरोज खान, महम्मद अजर, सय्यद इमरान पटेल, अब्दुल लतिफ, कासेफ भाई,अजय कांबळे मनोज कांबळे राहूल शिरसे, माजी नगरसेवक समिर भाई,उपस्थित होते. भगवान कांबळे हे सतत करत आसलेल्या सामाजिक कार्यक्रम घेत आसतात व त्यांच्या वाढ़दिवसा निमित्त वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष ऑ.बाळासाहेब आंबेडकर,सह भुसंपादन अधिकारी डाॅ सचिन खल्लाळ साहेब, जिल्ह्यातील विविध राजकीय कार्यकर्ते, धर्माबाद तालुक्यातील विविध कार्यालयाचे कर्मचारी,व शहरातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, अनेक आजी माजी नगरसेवक, पंचायत समिती सभापती, सदस्य व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, व सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष, कार्यकर्त्यांनी सर्व तालुक्यातील पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व सर्व पत्रकारांनी शुभेच्छा दिल्याआहेत .वाढदिवसावर खर्च न करता वरिल उपक्रम राबवली म्हणून त्यांचे कौतुक होत आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group