अवघ्या 24 तासात चोरट्यांना केले जेरबंद

प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली हिंगोली जिल्ह्यात मागिल काही महिन्यांपासून चोरिच्या घटनेत प्रचंड वाढ झाली असुन चोरट्यांनी हिंगोली शहरातील एक...



प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात मागिल काही महिन्यांपासून चोरिच्या घटनेत प्रचंड वाढ झाली असुन चोरट्यांनी हिंगोली शहरातील एका किराणा दुकानात चोरी करून 16 हजार रूपये किंमतीचा माल चोरून नेला होता या प्रकरणी 2 मार्च रोजी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर शहर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या चोवीस तासात चोरट्यांना जेरबंद केले आहे.मागील अनेक महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना घडत आहेत अद्याप पर्यंत सदर चोरीतील चोरट्यांना शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही मात्र हिंगोली शहरातील हरण चौक परिसरातील शेख फारुक शेख करीम तांबोळी यांचे किराणा दुकान फोडून चोरट्यांनी 16 हजार 400 रुपयांचा किराणामाल चोरून नेला होता.याप्रकरणी 2 मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्याची तात्काळ दखल घेत शहर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी तपासाची चक्रे गतिमान करत चोरीतील आरोपीं पारधीवाडा निवासी रवी पवार, दिपा पवार, काजल चव्हाण यांना अवघ्या चोवीस तासात बेड्या ठोकल्या तसेच त्या चोरट्यांकडून चोरी केलेला माल हस्तगत केला आहे. सदर चोरटयांना हिंगोली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या कामगिरी बद्दल पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे व डिबी पथकातील कर्मचारी शेख शकिल, उमेश जाधव, मुजीब शेख, गारवे, बांगर, होळकर यांचे पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी कौतुक केले आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel