धर्माबाद (अहमद लड्डा)
बन्नाळी ते धर्माबाद हा रस्ता आता जीवघेणा बनला आहे व ह्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवून रस्ता योग्य करण्या विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांना निवेदन देऊन हे खड्डे बुजवून रस्ता योग्य करण्यासंबंधी निवेदन दिले आहे. यात पुढे म्हटले आहे की मनसे ने मागे १३ ऑक्टोबर २०२० रोजी ह्या विषयावर निवेदन दिले होते. नंतर १३ ऑक्टोबर २०२० रोजी कार्यकारी अभियंता यांनी कंत्राटदाराला या रस्त्याचे सर्व खड्डे बुजवण्याची सूचना दिल्या होत्या आणि आंदोलनकर्त्याना आंदोलन मागे घेऊन प्रशासनास मदत करण्यासाठी विनंती केली होती. यांच्या म्हणण्यानुसार आंदोलन ही मागे घेण्यात आले. पण ह्या गोष्टीला चार महिन्यांहून अधिक काळ गेला आहे. रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून ह्या मार्गावर प्रवास करणारे लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. आता जर 19 मार्च 2021 पर्यंत हे खड्डे भरले गेले नाहीत,व रस्ता दुरुस्तीसाठी करण्यास आपण सक्षम नसाल तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काळात कोणतेही आंदोलन मागे घेणार नाही व हा रस्ता व्यवस्थित होईपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल. या विभागातील कोणत्याही कर्मचार्यांना कार्यालयात प्रवेश करू दिले जाणार नाही. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. ह्या निवेदनावर मनसे चे तालुका सचिव महादेव भुमन्ना माळगे आणि शिवानंद तोटलोड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS