राम दातीर
माहूर (प्रतिनिधी) भाजपा चित्रपट कामगार महीला आघाडी नांदेडच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी पद्मजा जयंत गिऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चित्रपट कामगार चळवळ सक्षम व सशक्त करण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कामगार नेते संजय केनेकर, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश साठे व भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय सरोज यांनी भाजपा चित्रपट कामगार आघाडीची ध्येय-धोरणे, कामगार व कलाकारांच्या समस्या जाणून संघटनेने दिलेले कार्यक्रम यशस्वी करून कामगारांच्या शास्वत विकासासाठी राबून देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये चित्रपटातील कामगार वर्गाचे स्थान अधोरेखित करण्याची जबाबदारी पार पडण्यासाठी कार्यरत असलेल्या संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी पद्मजा गी-हे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS