नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
नवनिर्वाचित सरपंचांना गावकऱ्यांनी निवडून देऊन गावचा प्रमुख केले असल्याने त्यांच्यासाठी काही देणे लागतो म्हणून भारतीय स्टेट बँक शाखा नायगावच्या वतीने तालुक्यातील विविध गावातील नवनिर्वाचित सरपंच महोदयाचा सन्मान करून सदर बँकेचे वरिष्ठ अधिकारी राम मूर्ती,सौ. शिल्पा गिरबिडे जिंतुरकर, सिद्धार्थ कांबळे यांनी बँकेच्या अनेक योजना विषयी मार्गदर्शन केले.
शहरातील भारतीय स्टेट बँक या दोन्हीही शाखेच्यावतीने सरपंच सन्मान दिवस या आयोजित केलेल्या कार्यक्रमात विचारपीठावर सदर बँकेचे वरिष्ठ अधिकारी राममूर्ती साहेब,सौ.शिल्पा गिरबिडे जिंतुरकर मॅडम, शाखा अधिकारी सिद्धार्थ कांबळे साहेब यासह शेतकी अधिकारी, भास्कर चाचटकर, बॅकेचे,केदार ताम्हणे, दीप्ती मॅडम, नागेश वडजे, सुधाकर संत्रे, व सौ. सी एस पी.महानंदा गायकवाड, राम मोरे, आयुब शेख,आनंद संत्रे,यांची प्रमुख उपस्थिती मध्ये तालुक्यातील निमंत्रित नवनिर्वाचित सरपंच राहूल पाटील नकाते बेटकबिलोली, शिवराज वरवटे ताकबिड, यशोदाबाई साहेबराव कांबळे पळसगाव, किरण कदम पिंपळगाव, युवराज लालवंडे लालवंडी, सुरेश पा. कदम खंडगाव, शोभाबाई शिंदे दरेगाव, फुलाबाई गणेश धसाडे सांगवी, सुधाकर डोईवाड डोंगरगाव, गणेश पवार होटाळा, शरद वडजे टेंभुर्णी, अशोक मोरे अंचोली, गणेश गाडले मुगाव, रमेश जाधव कांडाळा, विश्वनाथ मुंडकर मरवाळी, दत्ता पाटील गोदमगाव, प्रल्हाद बैस कोलंबी, भालके टाकळी,पुयड पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला असून सदर बँकेशी दत्तक असलेल्या एकूण बारा गाव कर्ज नुतूनिकर पुर्ण झाल्यामुळे गावातील ग्रामपंचायती साठी बँकेची भेट म्हणून छताचा पंखाही यावेळी भेट देवुन सन्मानित करण्यात आले, तर शिवराज वरवटे, शोभा शिंदे या सरपंचांनी बँकेविषयी शेतकऱ्याच्या काही अडचणी असल्याबाबत आपली मते मांडली असता बँकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन करुन बँक आणि गाव पुढारी सरपंचांना दैनंदिन व्यवहारासाठी ग्रुपची निर्मिती करण्यात आली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे सुधाकर संत्रे (Sale Asst) यांनी केले तर आभार शिवाजी पा. शिंदे यांनी मानले.

COMMENTS