सुजलेगांवच्या नियमबाह्य गौण खनिज उत्खनन प्रकरणात कागदोपत्रीच सोपस्कार ! दोषींविरुद्ध कारवाईसाठी राजरत्न डुमने यांचे उपोषण सुरु

नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) नायगांव तालुक्यातील सुजलेगांव येथील गट क्रमांक २३ व त्यालगतच्या शासकीय जमिनीतून केलेल्या नियमबाह्य...

नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

नायगांव तालुक्यातील सुजलेगांव येथील गट क्रमांक २३ व त्यालगतच्या शासकीय जमिनीतून केलेल्या नियमबाह्य मुरुम,गौण खनिज प्रकरणात महसूल प्रशासनाकडून केवळ कागदोपत्रीच सोपस्कार सुरु असल्याने दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कचेरीसमोर सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते राजरत्न डुमने यांनी आजपासून (दि.२४ ) आमरण उपोषण सुरु केले आहे.

  अधिक माहिती अशी की,मौजे सुजलेगांव (ता.नायगांव)येथिल गट क्रमांक २३ व त्यालगतच्या शासकीय जमिनीतून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य मुरुम,गौण खनिज उत्खनन करण्यात आलेले आहे.यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असल्याने व शासनाच्या लाखो रुपयांपर्यंतचा महसूलाचे नुकसान झाल्याने याबाबत प्रारंभी संबंधित बिलोलीचे उपविभागीय अधिकारी व संबंधितांना कळविल्यानंतर त्यांनी त्यावर स्वतः कार्यवाही ऐवजी परिविक्षाधिन उपविभागीय अधिकारी,नायगांव यांना चौकशीसाठी आदेशित केले होते.माञ त्यांच्यास्तरावरुन कोणतीही कारवाई नसल्याने जिल्हाधिकारी,नांदेड यांना विनंती पञ दिल्यानंतर त्यांच्याच अखत्यारितील गौण खनिज विभागाच्यावतीने या प्रकरणात केवळ कागदोपत्रीच सोपस्कार सुरु केल्यानंतर यामधील दोषींविरुद्ध ठोस कारवाई नसल्याने संबंधित दोषींकडूनच तक्रारकर्त्यावर बनावट साक्षीदारांकरवी कुंटूर पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा नोंदविण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरु झाल्याने सदर प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीसह संबंधितांवर दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी,सोबतच सदर दोषींकडून जिवित्वास धोका असल्याने आपणांस तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे या मागणीसाठी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते राजरत्न डुमने यांनी आजपासून जिल्हाधिकारी, नांदेड कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

दरम्यान सदर प्रकरणात परिविक्षाधिन उपविभागीय अधिकारी व तहसिल प्रशासनाकडून स्थळ तपासणीनंतर दोषींविरुद्ध तात्काळ कारवाईऐवजी दोषींना पाठीशी घालीत असल्याने हा प्रकार संबंधित विभागाकडून संगनमतातूनच सुरु असल्याचे तक्रारकर्ते डुमने यांनी दावा केला आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group