३०० किलो रांगोळीतून साकारलेली महाराजांची प्रतिकृती ठरणार यंदाचे मुख्य आकर्षण
आष्टी (दादासाहेब बन)
कोरोनामहामारीच्या पार्श्वभूमीवर आष्टी शहरात यावर्षी आगळीवेगळी शिवजयंती साजरी होत असून या निमित्ताने शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकाच्या मध्यभागी १०१ फुट उंच असणाऱ्या शिवस्तंभाची उभारणी करण्यात येणार आहे.तर १२ × २४ स्वे.फुट जागेमध्ये अश्वारुढ शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणारी रांगोळी साकारण्यात येणार आहे.
सालाबादाप्रमाणे आष्टी शहरात शिवजयंती महोत्सवाचे आयोजन दि.१९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले असून कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी उत्साहात माञ कोरोनाच्या नियमांचे पालन करुन शिवजयंती साजरी करण्याचे शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
शुक्रवारी शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यातील पहिल्या १०१ फुट उंचीच्या शिवस्तंभाची उभारणी करण्यात येणार असून याचे ध्वजारोहन सकाळी १०:१५ मि.आ.सुरेश धस यांच्या हस्ते होणार आहे.तर याच दरम्यान उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करण्यात येणार आहे.तसेच कु.आरती नवनाथ ससाणे या विद्यार्थीनीची रांगोळीतून १२×२४ स्वे.फुट जागेमध्ये अश्वारुढ शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणारी तब्बल ३०० किलोतून साकारलेली रांगोळी शहरवासियांसाठी आकर्षक देखावा असणार आहे.सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शहरातील प्रत्येक घराघरात बुंदीच्या महाप्रसादाचे वाटप शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले असून यासाठी १२५ किलो बुंदीचे पॕकेट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.शिवजयंती निमित्त शहर भगवेमय झाले असून स्वराज्य लढ्यातील सूर मावळ्यांच्या आकर्षक कमानी ठिकठिकाणी
सजलेल्या आहेत.

COMMENTS