माया , ममता , प्रेम , आपुलकी ही " *जिव्हाळा* " या वटवृक्षाचीच गोंडस नावे ..... !
महिलांच्या जिव्हाळ्याचा, सण संक्रातीचा .. ! वाण लुटण्याचा ... ! नुकताच पार पडला . मात्र या सणानिमित्त अनोखं वाण लुटण्याचा कल्पक पायंडा सदैव नवोपक्रमशिल असणाऱ्या केजच्या महिला श्रीम . सुरेखा मंचकराव चौधरी यांच्या सुपीक कल्पनेतून महिलांच्या नवनिर्मित *जिव्हाळा* ग्रुपच्या माध्यमातून साकार झाला .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संक्रांत सणापूर्वी केजवाशिय महिलांना आवाहन करण्यात आले की , दरवर्षी आपण वाणाचे साहित्य खर्च करण्यात अमाप पैसा व वेळही खर्च करतो . शिवाय सर्वच वस्तू या उपयुक्त असतीलच असेही नाही . पण याच पैशाचा वापर आपण जर आर्थिक परिस्थितीने होरपळून निघालेल्या पण होतकरू व उच्चशिक्षित , अनाथ , दुर्बल घटकातील वंचितांना त्यांच्या शिक्षणासाठी केला तर निश्चितच देशाच्या जडणघडणीत आपला सिंहाचा वाटा असेल असा मनोदय श्रीम . सुरेखा ताईंनी आपल्या सखींजवळ व्यक्त केला . सखींनीही या विचाराचे स्वागत करत हे वाण जिव्हाळ्याचं असल्यानं या ग्रुपला " *जिव्हाळा* " नाव दिलं अन् पाहता पाहता जवळपास 11,000 रू . वाण स्वेच्छेनं जमा करुन . BBC चे संचालक श्री . हनुमंत भोसले यांच्या मार्गदर्शन पर उपस्थितीने दि .19 फेबु्वारी 2021 ला राधा करपे या नागपूरला M.D. चे शिक्षण घेणाऱ्या व अपर्णा कांबळे B. A. M. S नांदेड येथे द्वितीय वर्गात शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थीनींना प्रत्येकी 5,000 रु मदत देत देत जिव्हाळ्याचं वाणं लुटलं . सर्व केजवाशियांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करुन दरवर्षी आम्हीही हाच वारसा पुढे चालवू म्हणत या ग्रुपला आम्हालाही जॉईन करण्याची विनंती केली .
टीप - इच्छुक महिला भगिनींनी जॉईन होण्यासाठी श्रीम . चौधरी सुरेखा यांच्या 9421350708 या क्रमांकावर संपर्क साधावा .

COMMENTS