केज तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या गारपीटीसह अवकाळी पावसामुळे पिकांची अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून शासनाने तात्काळ मदत द्यावी या विषयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी केज च्या वतीने तहसील कार्यालयाला दिले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की यावर्षी बर्यापैकी पाऊस काळ झाल्यामुळे तालुक्यातील रब्बी पिके जमादार आली होती. परंतु शेतकर्यांच्या नशिबी कायमच आस्मानी असो वा सुलतानी असो अशी वेगवेगळी संकटे असतात. असाच प्रत्यय याहीवर्षी आलेला आहे. कसा तरी शेतकरी महावितरणच्या तावडीतून सुटतो का नाही तोपर्यंत- अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तालुक्यातील बहुतांशी भागात गेल्या दोन दिवसापासून वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील हरभरा ज्वारी गहू फळबागा भाजीपाला तसेच नवीन लावलेल्या ऊस हे पिके भुईसपाट होऊन अतोनात नुकसान झाले आहे. यासंबंधी महसूल प्रशासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे करून बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरलीधर बाप्पा ढाकणे, पंचायत समितीचे सभापती पती विष्णू भाऊ घुले व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS