सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शेळके रुजू झाल्यापासून तालुक्यात गुन्हेगारी,अवैध व्यवसाय कमी करण्यात यश आल्याचे दिसून येते शेळके यांनी यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयात आपले कर्तव्य बजावले आहे त्यांनी सेलू येथे असताना उल्लेखनीय कार्य केल्याने तत्कालीन पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी गौरवले आहे.सोनपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत ७३ गावे व १२ तांडे वाड्या येतात.त्यामुळे या ठाण्याला मोठी परिसीमा असल्याने तालुक्यात चोरी-छुप्या मार्गाने चालू असलेल्या अवैध व्यवसाय व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संदीपान शेळके यांनी कंबर कसली आहे.त्यास यश येत असून शेळके हे पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवत असल्याचेही दिसतेय.यासोबतच छोट्या-छोट्या कारणाने होणाऱ्या तंट्यांना समनव्यक भूमिकेतून मिटवत आहेत.यासोबत जिल्ह्यातील सर्वात जास्त जागा उपलब्ध असलेल्या पोलीस ठाण्यात सोनपेठचा समावेश होतो.याच पोलीस स्थानकाच्या आवारात असणारे अपघातग्रस्त वाहने,रेतीची वाहने,मोटारसायकली वेगवेगळ्या गुन्ह्यातील वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात होती ती वाहने परभणी येथील परिवहन विभागाच्या विभागीय नियंत्रकाच्या नियंत्रणाखाली हलवली असून या जागेत आता वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहीती शेळके यांनी केली.

COMMENTS