नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत 3 फेब्रुवारी 2021 रोजी येथील तहसील कार्यालयाच्या प्रागणांत उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली सुफीयान शेख याने हाताने चिटी लकी ड्राॅ पद्धतीने आरक्षण सोडत काडण्यात आली आहे .विशेष म्हणजे घुंगराळयात वंसत सुगावे आणि रानसुगांव मध्ये शिवाजी जाधव या दोन गटाकडे बहुमत आसताना सरपंच पदाचा उमेदवार नसल्याने विरोधकांनी अल्प संख्याबळावर ग्रामपंचायतीवर झेंडा लावला आहे .घुगराळा आणि रानसुगांव येथील गाव नाकरले पण चिटी ने तारले आसेच काही म्हणावे लागेल .
यात नायगांव तालुक्यातील 80 ग्रामपंचायती पैकी 40 ग्रामपंचायतीचा कारभार महीला सरपंचाच्या हाती आला आहे.अनुसूचित जातीसाठी एकुन 17 तर महिलांसाठी 8 , अनुसूचित जमातीसाठी एकुन 4 ,तर महिलांसाठी दोन सरपंच पदाचे आरक्षण सुटले तर नागरीकांचा मागास प्रवर्ग एकुण 22 यात महिलांसाठी 11 सरपंच पदासाठी आरक्षण सुटले आहे . सर्वसाधारण खुल्याप्रवर्गासाठी एकुण 37 तर यात 19 महीलाना सरपंच पदाचे आरक्षण सुटले आहे .एकुणच तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीचे आरक्षण पैकी 40 गावचा कारभार महिलांच्या हाती आला आहे .
नायगांव तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायती मधील बरबडा, कुंटुर, कुष्णुर, मांजरम, नरसी, रूई (बु) आंचोली, मुगाव, होटाळा, देगांव या गावात पुर्वीचेच आरक्षण जैसे थे राहीले आहे .लकी ड्रॉ पद्धतीने सरपंच आरक्षण सोडत काढताना घुंगराळा येथील राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष वंसत सुगावे यांच्या गटाने 9 पैकी 7 जागा निवडु आणल्या होत्या पण त्यांचा सरपंच पदाचा उमेदवार पराभुत झाला होता पण त्यांना नविन आरक्षण सोडतीवर त्यांची अपेक्षा होती पण चिठी मात्र नागरीकाचा मागास प्रवर्ग महीला ची निघाल्याने बहुमत आसुनही सतेच्या बाहेर राहवे लागले तर पंडित सुगावे यांच्या पॅनलने दोन उमेदवा-याच्या जोरावर घुंगराळा ग्रामपंचायत झेंडा लावला आहे .रानसुगांव येथील शिवाजी जाधव यांच्या गटाला गावक-याने बहुमत दिले पण सरपंच पदाचा उमेदवार नसल्याने पुन्हा चिठ्ठी च ठरली विरोधकांना लक्की आसाच काही चिठीवर घुंगराळा आणि रानसुगांव लक्की ठरले आहे .
सरपंच आरक्षण सोडतीला या वेळी नायगांव चे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे, तहसीलदार गजानन शिंदे, मृनाली जाधव ,नायब तहसीलदार नवनाथ वगवाड, नंदकीशोर भोसीकर, डी.डी.लोंढे.आर.आर.आलमवाड. तलाठी बालाजी राठोङ.शेख युनुस.लक्ष्मण अन्नमवाङ.आदींची उपस्थिती होती.

COMMENTS