धर्माबाद (अहमद लड्डा)
स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने नोव्हेंबर २०२० पासून कृषी कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कृषी कर्जमाफी योजना सुरू केली आहे. या कर्जमाफीचे नाव "ऋण समाधान योजना " असे आहे. ऋण समाधान योजनेत, कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण व्याज माफ केले जात असून उचललेल्या कर्जातील मुद्दलापैकी १० ते २० टक्के रक्कम बँकेत भरणा करून कर्ज मुक्त होता येणार आहे. यासाठी कर्जाची रक्कम किमान दोन वर्षांपूर्वी थकीत असेल तर थकबाकीदार लाभास पात्र ठरणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक ३१ जानेवारी २०२१ ही शेवटची तारीख या पुर्वी जाहिर करण्यात आली होती. आता या तारखेत वाढ करण्यात आली असून ३१ मार्च २०२१ ही शेवटची तारीख ठेवण्यात आली आहे. तेंव्हा अधिक अधिक थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे. असे आवाहन स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक श्री शंकर येरावार यांनी केलं आहे. विशेष म्हणजे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज दिले जाणार आहे. असही मुख्य व्यवस्थापक येरावार यांनी आकाशवाणीशी बोलतांना सांगीतलं. यापुर्वी राज्यातील भाजप सरकारने मुद्दल आणि व्याजाच्या रक्कमेसह दिड लाख रुपयांपर्यंतचे तर विद्यमान महाविकास आघाडी सरकारने मुद्दल आणि व्याजासह दोन लाख रुपयांची शेती कर्जमाफी दिली होती. त्या पुढील रक्कमेच्या थकबाकीदारांना दोन्ही कर्ज माफीचा लाभ मिळाला नव्हता. तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थकीत शेती कर्ज खातेदारांना मिळणार . तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.असे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

COMMENTS