अनेकांच्या उपस्थित चापोली येथे अंत्यसंस्कार
लातूर- मुंबई येथील आयकर विभागातील आयुक्त मुकुंद चाटे यांचे वडील मारूती विठ्ठलराव चाटे यांचे वृद्धापकाळाने शनिवारी पहाटे पुणे येथील दिनानाथ हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. स्व. चाटे यांचेवर त्यांच्या मूळगावी चाकूर तालुक्यातील मौजे चापोली येथे अनेकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले. आ. रमेशआप्पा कराड यांच्या बहिणीचे ते सासरे होते.
आदर्श शिक्षक पुरस्कारने सन्मानित मारूती चाटे हे हाडाचे शिक्षक म्हणून संपूर्ण लातूर जिल्ह्यात परिचीत होते. शिक्षकी पेशा पासून सुरू केलेली कारकीर्द मुख्याध्यापक पदापर्यंत पोहचून सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यात अमूल्य असे योगदान दिले होते. तसेच, आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. त्यापैकी मुकुंद चाटे हे सध्या मुंबई येथे आयकर विभागात आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. तर लातूर येथील सुप्रसिद्ध डॉ. चंद्रकांत चाटे हे त्यांचे दुसरे पुत्र आहेत.
स्व. मारूती चाटे यांच्या पश्चात पत्नी अनुसया, दोेन मुले, एक मुलगी व नातवंडे असा मोठा परिवार आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांचे व्याही आ. रमेशअप्पा कराड यांच्या भगिनी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे यांचे ते सासरे होते.
स्व. मारुती चाटे यांच्यावर शनिवारी सायंकाळी चापोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पाहुणे नातलग मित्रपरिवार चापोली येथील ग्रामस्थ आणि परिसरातील अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS