त्यांनी’ तुझा आणि माझाही विश्वासघात केला | शीतल आमटेंच्या पतीची भावूक पोस्ट

 नागपूर : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या दिवंगत शीतल आमटे यांच्या वाढदिवसानिमित्त शीतल यांचे पती गौतम...

 नागपूर : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या दिवंगत शीतल आमटे यांच्या वाढदिवसानिमित्त शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. 


फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गौतम यांनी एक व्हिडिओ शेअर करत शीतल यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पहिल्या पोस्टमध्ये गौतम यांनी लिहिलंय

‘आज तुझा ४० वा वाढदिवस!

तू खूप दूर निघून गेली असलीस तरी अजूनही तू माझ्या जवळच आहेस,

तुला मिठीत घ्यावसं वाटतंय पण प्रिये…

तुला अशाप्रकारे येथून शुभेच्छा द्याव्या लागतील अशी मी कधीच कल्पना केली नव्हती.

मला अजूनही विश्वास बसत नाही की, तू माझ्यासोबत आता नाहीस. आपण वयाची चाळीशी गाठल्यानंतर पुढील जीवन कसं जगायचं याबाबत योजना आखल्या होत्या. तू नेहमी म्हणायचीस….आयुष्यात वर्षांची भर घालण्यापेक्षा वर्षांमध्ये आयुष्याची भर घालत जाणं जास्त महत्त्वातू माझ्यासाठी चमकता तारा राहिली होतीस आणि कायमच राहणार आहेस. तू मला आनंदवनाची ओळख करून दिली. अर्थपूर्ण जीवनाचं महत्त्व काय असतं, हे मला शिकवलंस. तू एक चांगली लेक, मैत्रीण, मार्गदर्शक, आई आणि पत्नी होतीस. बाबा आणि ताई यांनी जपलेल्या मूल्यांची तू सच्ची अनुयायी होतीस. मला आज खूप दु:ख होत आहे. 

ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला आहे. तुझ्यापासून सुटका करून घेण्यात ते यशस्वी ठरलेत खरे पण आनंदवनाला ते तुझ्यापासून वेगळं करू शकणार नाहीत. कारण आनंदवनात बाबा आणि ताईंनंतरची जागा तू कधीच मिळवली आहेस.चं आहे.आज तुझ्या वाढदिवशी मी तुला वचन देतो की, तुझ्या अपेक्षेप्रमाणे मी शर्विलचं संगोपन करेन. तू तुझ्या आयुष्यात जी मूल्ये जपली आणि जगलीस ती सारी मूल्ये शर्विलमध्ये उतरतील, याची काळजी मी घेईन. मला खात्री आहे की, तू अशा कुटुंबात पुनर्जन्म घेशील, ज्यांना आपल्या मुलीची काळजी आहे. 

जे प्रेम आई-वडिलांकडून त्यांच्या लेकीला मिळणं आवश्यक असतं ते तुला तेथे नक्कीच मिळेल. मी नेहमीच माझ्या चमकत्या तार्‍याची वाट पाहत राहीन.’

तुझाच गौतम

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel