रमेश इतापे केज
मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये वेळोवेळी मतदार नोंदणी या राष्ट्रीय कार्यात केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल केज तालुक्यातील जि.प. कें.प्रा.शाळा लहुरी येथील सहशिक्षिका श्रीमती गिरी अश्विनी अशोक राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदार नोंदणी अधिकारी ( बी एल ओ ) म्हणून सन्मान पत्र देऊन केज चे तहसीलदार मा. श्री. दुल्हाजी मेंढके व नायब तहसीलदार श्री .सचिन देशपांडे यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला .
या विषयी सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय मतदार दिनाच्या औचित्याने मतदार व्यक्ती मध्ये जन जागृती निर्माण व्हावी ,निवडणूक विभागात जे व्यक्ती काम करतात त्यांना प्रोत्साहन मिळावे या साठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.उत्कृष्ट बी एल ओ म्हणून श्रीमती गिरी अश्विनी अशोक यांचा केज तहसील चे तहसीलदार मा. श्री . दुल्हाजी मेंढके व नायब तहसीलदार श्री .सचिन देशपांडे यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये वेळोवेळी मतदार नोंदणी या राष्ट्रीय कार्यात केलेल्या उत्कृष्ट कामकाजा बद्दल समस्त लहुरी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

COMMENTS