नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा (बु) येथिल जि.प.केंद्र प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टिचे नेते गंगाधर पाटिल अंबुलगेकर यांच्या वतिने मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.महाराष्ट्र शासनाने महामारी कोरोनाचा प्राद्रुभाव कमी झाल्यामुळे इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतचे वर्ग सुरूवात केलेले आहेत .पण प्रत्येक विद्यार्थांना मास्क बाधुन येणे बंधनकारक केले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची व शिक्षकांची आरोग्याची काळजी पाहता.गंगाधर पाटिल अंबुलगेकर यांनी विद्यार्थ्यांना मास्क वाटपाचा अतिशय चांगला उपक्रम राबविला.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर पाटिल, ग्रां.प.सदस्य प्रतिनिधी हुल्लाजी रॅपनवाड, प्रतिष्ठित व्यापारी बाबुसावकार उल्लिगडे, पत्रकार विठ्ठल कल्याणपाड ,रमेश देशटवाड,बालाजी पा.कदम,बळु पा.कदम,गोविंद पा.कदम,बालाजी पा.महादाळे,सहशिक्षक बिरादार सर, पेंडलवार सर ,सहशिक्षिका मोरे मॅडम यांची उपस्थिती होती.

COMMENTS