नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
परवानगीच्या नावाखाली शेकडो ब्रास मुरूम उत्खनन करण्यात आलेल्या तालुक्यातील मेळगाव, होटाळा, अंतरगाव व कृष्णूर येथील विविध गट क्रमांकाच्या मुरूम उत्खनन जागेची चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे आदेश कर्तव्यदक्षा तहसीलदार सौ. मृणाली जाधव यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले.
महसूल अधिकाऱ्यांनी शासनाची मालमत्ता जतन करण्याऐवजी शासनालाच गंडा घालत असल्याचे स्पष्ट चित्र तालुक्यातील मेळगाव, होटाळा, अंतरगाव व कृष्णूर येथील संबंधित महसुलचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या संगनमताने झालेले असून त्याचे कारण अशी की, मेळगाव येथील नुसरत कंट्रक्शनने 500 ब्रास च्या नावावर हजारो ब्रास मुरूम उत्खनन केले तर होटाळा येथे शंभर ब्रासच्या नावावर शेकडो ब्रास मुरूम काढले असल्याने याबाबत सामाजिक कार्यकर्ते माधव बैलकवाड, विश्वंभर वने, शेख आरिफ यांनी सदर गावच्या गट क्रमांकावरील जेसीबी, हायवा व मुरूम उत्खननाचा फोटो काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविला आहे व संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी आणि महसूल विभागाचे नायब तहसीलदार यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविल्यानंतर एकाही अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले नाही.म्हणुन सदर कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने दिनांक 25 जानेवारी रोजी नायगाव तहसील कार्यालय पुढे धरणे आंदोलन केले.तेव्हा कर्तव्यदक्षा तहसीलदार सौ.मृणाली जाधव यांनी या आंदोलनाची वेळीच दखल घेऊन कार्यकर्त्यांच्या तक्रारीनुसार मेळगाव गट क्रमांक 56 येथे नरसी येथील मंडळ अधिकारी, होटाळा गट क्रमांक 162 मध्ये कुंटूर मंडळाधिकारी, कुष्णूर गट क्रमांक 386 येथे मांजरम मंडळाधिकारी तर अंतरगाव गट क्रमांक 411 मधील नायगाव मंडळ अधिकारी यांना जायमोक्यावर जाऊन किती ब्रास मुरूम उत्खनन केले आहे यांची चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे आदेश तहसीलदार सौ. जाधव यांनी दिले आहेत.

COMMENTS