*अंबुलगा (बु) ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनल चा दणदणित विजय.....बालाजीराव पाटील अंबुलगेकर यांच्या हाती पुन्हा एकदा गावची सत्ता.*



नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील दि.१५ रोजी पार पडलेल्या १०२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल दि.१८ रोजी लागला आहे.यावेळी मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथिल पंचायत समितीचे माजी उपसभापती 

बालाजीराव पाटील अंबुलगेकर यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास पॅनल चे ९ चे ९ उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले.आंबुलगा ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण २० उमेदवार रिंगणात होते

त्यात ग्रामविकास पॅनल चे ९ व लालबावटा प्रणित लोकपर्याय पॅनल चे ९ आणि अपक्ष २ असे उमेदवार रिंगणात होते.

यापूर्वी ग्रामपंचायती ची सत्ता ही लालबावटा प्रणित लोक पर्याय पॅनल यांच्याकडे होती.

परंतु मागील ५ वर्षातील त्यांच्या विकास कामाचा उतरता आलेख पाहून मतदारांनी त्यांना मतदानाच्या माध्यमातुन नाकारले व दणदणीत पराभव करून मुखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजीराव पाटील अंबुलगेकर यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास पॅनल ला स्पष्ट बहुमत देत ९ चे ९ उमेदवार निवडूण दिले.यावेळी बालाजीराव पाटिल अंबुलगेकर यांच्या समवेत गंगाधर पाटिल अंबुलगेकर ,शिवाजी बळवंतराव पाटिल अंबुलगेकर ,बाबुसावकार उलिगडे ,सुधाकरराव मामीलवाड ,विठ्ठराव नागमवाड , विठ्ठल कल्याणपाड व ग्रामविकास पॅनलच्या इतर कार्यक्रत्यांनी गावातील नागरिकांनी ग्रामविकास पॅनल ला स्पष्ट बहुमत दिल्यामुळे सर्व नागरिकांचे आभार मानले 


टिप्पण्या