ग्रामपंचायत हे बच्चेवार ग्रामविकासाचे स्वतंत्र सत्ताकेंद्र -----

नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)  ग्रामपंचायत हे ग्रामविकासाचे स्वतंत्र सत्ताकेंद्र असून ग्रामपंचायत एक स्वतंत्र कार्यप्रणाली आहे .ग्र...


नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)

 ग्रामपंचायत हे ग्रामविकासाचे स्वतंत्र सत्ताकेंद्र असून ग्रामपंचायत एक स्वतंत्र कार्यप्रणाली आहे .ग्रामपंचायत सदस्य ,तथा गाव पुढाऱ्यांनी मिळालेल्या संधीतून आणि अधिकारातून गावाचा संपूर्ण विकास करून घ्यावा . ग्रामविकासाच्या पायाभूत आणि सर्वांगिन विकासाचे केंद्र म्हणजे ग्रामपंचायत होय देशाच्या स्वातंत्र्यानंतर "ग्रामस्वराज" ही संकल्पना आणि स्वप्न महात्मा गांधी यांचे होते, गाव पुढारी हेच ग्रामीण विकासाचे शिलेदार असतात असे रोखठोक परिवर्तनवादी अभ्यासू प्रतिपादन नायगाव विधानसभा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

             नायगाव विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा 18 जानेवारी 2021रोजी बालाजी बच्चेवार यांच्या हस्ते नायगाव येथे संपन्न झाला.

 आपल्या प्रदीर्घ, संघर्षमय अनुभवातून आपल्या खास शैलीत बच्चेवार यांनी ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन केले. 

पुढे बोलताना बच्चेवार म्हणाले की लोकसेवा ही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गाव पुढाऱ्याने जनतेप्रती उत्तरदायित्वाची भावना जोपासावी लागते .मी समाजाचे देणे लागतो आहे हा सेवाभाव आत्मसात करून निर्भीड, निपक्षपाती, सर्वधर्म समभावाने, निस्वार्थपणे लोककल्याणकारी कार्य ग्रामपंचायत स्तरावर केली पाहिजे.

 ज्या गावात ग्रामपंचायत नाहीत त्या गावात नवीन ग्रामपंचायत मा. विभागीय आयुक्त यांच्या परवानगीने स्थापन करता येते. त्यासाठी त्या गावची लोकसंख्या कमीत कमी सहाशे (600) असावे लागते .ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी 7 सदस्य तर जास्तीत जास्त 17 सतरा सदस्य मोठ्या ग्रामपंचायत मध्ये असतात महिला आणि राखीव प्रवर्गासह. गावाचे मंत्रालय म्हणजेच ग्रामपंचायत.

 ग्रामपंचायत हे ग्रामविकासाचे स्वतंत्र सत्ताकेंद्र असून तसा कार्यभार करण्यासाठी मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 कलम 5 अन्वय अधिकार देण्यात आले आहेत. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 ऑक्टोबर 1959 रोजी पंचायतराज ही संकल्पना लागू केली.

ग्रामपंचायतीने शाश्वत व जलद, गतीने गावचा विकास करण्यासाठी 26 जानेवारी ,15 ऑगस्ट ,2 ऑक्टोबर ,1 मे अशा दिवशी विशेष ग्रामसभांचे आयोजन करावे .लोकांच्या सांगण्याप्रमाणे विकासाच्या योजना आखाव्यात ,ठराव घ्यावेत, कामे मंजूर करून आराखड्याप्रमाणे विकास कामे करावी आणि केलेल्या कामाचा रोकलेखा ,मस्टर, मोजमाप पुस्तिका ,ताळेबंद हिशोब ग्रामसभेत चावडी वाचन करावे. भूमी रेकॉर्ड ,कर वसुली, मागासवर्गीयांचा योजनेतून विकास ,दिवाबत्तीची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, सार्वजनिक स्वच्छालय स्वच्छता ग्रह ,सांडपाण्याची विल्हेवाट, जलसिंचन, बाजाराची सोय ,यात्रा आयोजन आणि नियोजन, वृक्षारोपण ,शाळा व्यवस्थापन, महिलांसाठी गृह उद्योग, महिलांच्या आरोग्य सुविधा ह्या अशा अनेक लोक विकासाच्या योजना राबवाव्यात तरच आपण लोकांच्या विश्वासाला पात्र ठरू. आपले गाव स्वच्छ आणि सुंदर निर्व्यसनी बनवाल तर आपण केलेल्या कामाचा आणि आपल्या गावाचा लोकिक, यशोगाथा महाराष्ट्रभर जाईल. संपूर्ण गावाला "सह्याद्रिची उंची आणि शिवनेरीची श्रीमंती मिळाल्याशिवाय राहणार नाही"

 मिळालेल्या संधीचे आणि अधिकाराचा वापर करून लोकांना अभिप्रेत असलेला विकास साध्य करून घ्यावा अन्यथा येणारा काळ आपल्याला नक्कीच माफ करणार नाही. ग्रामपंचायत हे ग्रामविकासाचे स्वतंत्र सत्ताकेंद्र आहे.

 असे रोखठोक संघर्षमय प्रधीर्ग अनुभवाचीे कृतिशील ,धगधगत्या विचाराची मशाल भाजपाचे जेष्ठ नेते बालाजी बच्चेवार यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यां पूढे व्यक्त केली

  यावेळी नायगाव विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel