केज दि २९(प्रतिनिधी)
शाळा महाविद्यालयात येणारा विद्यार्थी ग्रामीण भागातुन येत असतो.त्याला मिळणारे उच्च शिक्षण मराठीतुनही मिळाली पाहिजे.विज्ञान शाखेचे अध्यापन मराठी भाषेतुन झाल्यास त्याच्या संकल्पना स्पष्ट होतील .पर्यायाने मराठी भाषा ही ज्ञान भाषा बनली पाहिजे असे प्रतिपादन भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य हनुमंत सौदागर यांनी केले.ते बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रमात बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधवराव फावडे हे होते.पुढे बोलतांना प्राचार्य सौदागर असे म्हणाले की या पंधरवाड्यात महाविद्यालयातुन कथा व कविता ,नाटक या वर कार्यशाळा घेवुन विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त सहभाग वाढला पाहिजे.विचारांना कृतीची जोड असली पाहिजे असे सांगितले.या प्रसंगी प्रा.बाबासाहेब हिरवे यांनी कवितेची निर्मिती या वर विवेचन करुन "बाप"नावाची कविता सादर केली.प्रसंगी डॉ.संदीपान गायके,प्रा.जरीचंद यादव ,डॉ.सुनिल राऊत यांनी ही विचार प्रकट केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.फावडे यांनी भाषा संवर्धनाच्या उपाय योजना वर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.छञभुज सोळंके यांनी केले तर सुञसंचालन डॉ.प्रशांत क्षीरसागर यांनी व काव्यमय आभार प्रदर्शन विद्यार्थींनी प्रेमा चटप यांनी केले.या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.कार्यक्रमास उपस्थित होते.

COMMENTS