केज दि २९(प्रतिनिधी)
प्रत्येक व्यक्तीने मतदान करून लोकशाही मूल्ये जपली पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद मतदानात असल्याचे प्रतिपादन प्रा डॉ टी एस बिडवे यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व लोकप्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकशाही पंधरवडा या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ गौतम पाटील हे होते. यावेळी प्राचार्य हनुमंत सौदागर, प्रा डॉ सुरेश आरडले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य सौदागर म्हणाले की, मत विकणे किंवा मत विकत घेणे हा सर्वात मोठा अपराध आहे. मतदान हे सदसद विवेक बुद्धीला जागृत ठेवून करणे, हेच सुदृढ लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यक्ष समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ पाटील यांनी, लोकशाही सर्वोत्कृष्ट शासन प्रणाली असून ती समता, न्याय व बंधुता या मूलभूत तत्वावर आधारलेली आहे असे सांगितले. यावेळी विद्यार्थी उन्मेश नेरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ जे के जाधव प्रास्ताविक प्रा डॉ सुरेश आरडले तर आभार डॉ नागेश कराळे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS