केज प्रतिनिधी.
विजमंत्री नितीन राऊत आपल्या शब्दावरून फिरले व वीज मंडळाचे कर्मचारी घरगुती विज सक्तीने वसुली करु लागले नाहीतर लाईट कट करून नागरिकांना अंधारात ढकलू लागले आहेत . विज मंडळाचे कर्मचारी जे ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी कधीही तत्पर नसतात पण वापरापेक्षा जास्त बील देऊन वसुली मात्र सक्तीने करतात . अधिकारी ग्राहकांचे फोन सुध्दा उचलत नाहीत आणी ग्राहकांना होणाऱ्या त्रासातुन मोकळीक पण होत नाही , त्यामुळे अनेक विज ग्राहकांना मानसिक त्रास होत असुन आत्महत्या चे विचार डोक्यात येत असल्याच्या भावना निर्माण होत असल्याच्या चर्चा होत आहेत . अश्या विज मंडळाचे अधिकारी व विज मंत्र्यावर गुन्हे दाखल करावेत अशी चर्चा नागरिकात होत आहे .
महाराष्ट्र राज्याचे विज मंत्री नितीन राऊत यांनी विज बीलात सवलत देण्याच्या त्यांच्या वक्तव्यावरून आपले शब्द बदलले आणी विज कर्मचाऱ्यांनी गावोगाव सक्तीच्या वसुलीला सुरूवात केली . मागील वर्षभरात ग्रामीण भागातील सर्व नागरिक आर्थिक संकटात सापडलेले असताना व कोणत्याही नागरिकांना १००% विज न देता १०० % विज बील वसुली करताना कोणत्याही प्रकारची जबाबदारी ची जाणीव राहत नाही , संपूर्ण जनता आर्थिक संकटात असताना व विज मंडळाकडे मागील तीस चाळीस वर्षापासून डिपॉझिट असताना तसेच पुन्हा मध्यंतरी डिपॉझिट रक्कम एक हजार जास्तीची भरून घेऊनही विज बीला साठी सक्ती केली जाते अर्थात हे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकते . डिपॉझिट भरून पुन्हा मिटर भाडे , स्थिर आकार व ईतर आकार करून १०० रुपये जादाचे घेतात तसेच प्रत्येक महिन्याला नियमित बील न देता थकबाकी म्हणून चक्रवाढ पध्दतीने व्याज आकारुन सक्तीच्या वसुली करत आहेत .
मागील वर्ष भरात संपूर्ण जग थांबलेले असताना व सगळ्या जगाची अर्थ व्यवस्था बिघडलेली असताना महाराष्ट्र राज्यात विज सक्तीने वसुली करत आहेत , अनेक वर्षापासून विज मंडळात जमा असलेल्या डिपॉझिट चे व्याज हि महामंडळ देत नाही व सामान्य जनतेला हे महामंडळ नाहक त्रास देत आहेत , यामुळे सर्व सामान्य विज ग्राहकांना प्रचंड मानसिक त्रास होत असल्यामुळे या ग्राहकांना आत्महत्या करावी असे वाटत असल्याची भावना मनात निर्माण होत आहे अशी चर्चा होत आहे , त्यामुळे विज मंत्री नितीन राऊत तसेच विज मंडळाचे कर्मचारी यांच्या वर गुन्हे दाखल केले जावेत अशी मागणी नागरिक करत आहेत
सहाय्यक अभियंता ना फोन उचलायचे वावडे
केज विभागाचे सहाय्यक अभियंता यांना कधीही फोन केला तरी हे कर्मचारी कधीही फोन उचलत नाहीत जेव्हा पत्रकारांचे फोन हे उचलत नाही तर सामान्य ग्राहकांना यांचा प्रतिसाद असेल काय असा प्रश्न सगळे विचारत असतात . मग हे सामान्य ग्राहकांचे प्रश्न तरी सोडवत असतील का ? असा प्रश्न निर्माण होतो

COMMENTS