*अशोक गायकवाड यांची जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,तहसीलदारांकडे तक्रार..*
केज ! प्रतिनिधी
*केज तालुक्यातील घाटेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गायकवाड यांनी घाटेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचा भंग केला आसून त्यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी अशोक गायकवाड यांनी जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,तहसिलदार यांच्याकडे केली आहे.*
केज तालुक्यातील घाटेवाडी ग्रामपंचायत निवडणूक सध्या बिनविरोध झाली आसून या निवडणुकीत घाटेवाडी येथिल जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले शिवाजी गायकवाड यांनी आपला स्वतंत्र गट तयार करूण ग्रामपंचायत बिनविरोध काढली आहे.परंतू जिल्हा परिषद शाळेच्या उच्च पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने शाळेकडे दुर्लक्ष करत राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला आसून दि/04/01/2021 रोजी मुख्याध्यापक शिवाजी गायकवाड यांनी आपला गट बिनविरोध निवडून आल्यानंतर तहसिलच्या आवारात गुलालाची उधळण करण आनंद व्यक्त केला आहे.मात्र त्यांना त्याचा आनंद जास्त काळ टिकवता आला नसून मुख्याध्यापक शिवाजी गायकवाड यांनी निवणूक आयोगाने घातलेल्या आचारसंहितेचा भंग केला आसून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी अशोक गायकवाड यांनी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार,बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार,केजचे तहसिलदार दुल्हाजी मेंढके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
*सिईओंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष..*
कर्तव्यदक्ष सिईओ अजित कुंभार यांनी आजपर्यंत अनेक प्रकरणामधील दोषी अधिकार्कायांवर कडक कारवाई केली आहे.परंतू या प्रकरणाती सिईओ अजित कुंभार काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS