धर्माबाद (अहमद लड्डा)
धर्माबाद शहरातील नव्यानेच बाँधन्यात आलेल्या क्रीड़ा संकुल येथे ह्या पहिल्याच स्पर्धेचे उदघाटन प्रसिद्ध उद्योगपती श्री सुबोध काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुने म्हणून पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले हे होते. व्यासपीठावर जेष्ठ खेळाडू अनिल रत्नालीकर,माजी नगर सेवक शादूल मौलाना,नांदेड़ जिल्हा मास्टर गेम असोसिएशन उपाध्यक्ष अनूपसेठ कासलीवाल, क्रीड़ा संयोजक अहमद लड्डा, पोलीस खेळाडू शेख शब्बीर, तैनात बेग आणि ला बा शा महाविद्यालय चे कर्मचारी सुरेश भद्रे हे होते. ह्या क्रीड़ा संघटनेच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमात सुरेख सूत्र संचालन प्रलोभ कुलकर्णी सर यांनी केले पोलीस खेळाडू शेख शब्बीर यांनी आभार मानले.या कार्यक्रमात जेष्ठ खेळाडू अनिल रत्नालीकर, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ल्ले आणि उद्योगपती सुबोध काकाणी यांनी खेळाडूनां मोलाचे मार्गदर्शन केले.
नांदेड जिल्हा हौशी अथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री कार्यक्रम व राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड चाचणी सकाळी 8 वाजेपासून घेण्यात आली. या स्पर्धेत खुल्या गटात पुरुष 12 किलोमीटर, ओपन ग्रुप महिला, 10 किलोमीटर, 21 अंतर्गत गटातील मुले, 8 किलोमीटर, मुली, 6 किलोमीटर, 16 वर्षाखालील मुले 2 किलोमीटर आणि 16 वर्षाखालील मुली 2 किलोमीटर असे ह्या स्पर्धेचे स्वरूप होते.या स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी नांदेड़ येथून आलेले प्रलोभ कुलकर्णी सर, वैभव सर, सोनसले सर, धर्माबाद चे क्रीड़ा संयोजक अहमद लड्डा, पोलीस खेळाडू संतोष आनेराव, दिपाली बड्डावार व विद्यापीठ खेळाडू शिवाजी गोस्कुलवाड आणि सलाउद्दीन यांनी येथे काम पाहीले. येथील विजयी खेळाडुंची 31 जानेवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठीं निवड झालेली आहे.

COMMENTS