सोनपेठ/प्रतिनिधी
योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज हा कारखाना शेतकऱ्यांच्या हिताशी बांधील असून शेतकऱ्याचे हीत यातच कारखान्याचे हीत असल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीजवरील कोणत्याही कर्मचारी अथवा ऊसतोड कामगार,टायरगाडी सदस्य यांना पैसे देऊ नये असे आवाहन योगेश्वरी शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर अँड.रोहीत देशमुख यांनी केले आहे.यावेळी त्यांनी सांगितले की,योगेश्वरी शुगर हा साखर कारखाना मागील वीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या अविरत सेवेमध्ये यशस्वीरित्या चालू आहे.३१ डिसेंबरपर्यंत कारखान्याच्या वतीने एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.आगामी काळात ऊस पुरवठा करण्यासाठी तोडणी व वाहतूक ठेकेदार यंत्रणा उपलब्द झालेली आहे.चालू हंगामासाठी कारखान्याच्या वतीने अडीच लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.त्याअनुषंगाने ऊस नोंदीप्रमाणे ऊस प्रोग्राम चालू आहे.नोंद केलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे गाळप होईल याची कारखान्याच्या वतीने हमी देऊन सर्व उसाचे गाळप करण्यासाठी कारखाना प्रशासन कटिबद्ध असल्याने त्यानुसार तोडणी वाहतूक कामासाठी रीतसर करार करून वाहतूकदारांना त्यांचे बिलापोटी रक्कम देण्यात आली आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस गाळप करण्याची जबाबदारी वाहतूक ठेकेदार,तोडणी कामगारासोबतच आमची असल्याने तोडणी ठेकेदारांनी पैशाची मागणी केल्याचे निदर्शनास आले आहे.त्या अनुषंगाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तोडणी ठेकेदार,तोडणी लेबर किंवा वाहनचालक यांना पैसे देऊ नयेत ठेकेदाराने तोडणी मजुराने किंवा वाहनचालकाने ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून पैसे घेतल्यास त्याच्या उर्वरित मानधनातुन ही रक्कम वजा करून तक्रारदार शेतकऱ्याला दिली जाईल.त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसतोडणीसाठी कोणीही पैसे मागितल्यास त्यावर कार्यवाही करण्याचा इशारा कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर अँड.रोहीत देशमुख यांनी दिला आहे.

COMMENTS