माजलगाव ( प्रतिनिधी ) तालुक्यातील खानापुर ग्रामपंचायतीच्या वतीने शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधीच्या धनादेशाचे दि १३ जाने बुधवार रोजी सकाळी १०;३० वाजता सरपच व ग्रामसेवकांच्या हास्ते वाटप करण्यात आले, व याच कार्यक्रमात पुरस्कार जाहिर झालेल्या पत्रकारांचाही सत्कार करुन सन्मान करण्यात आला.
माजलगाव तालुक्यातील खानापुर ग्रामपंचायत हि विविध विकास कामात आग्रेसर असुन ग्रामपंचायतीच्या वतिने शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत हाद्दीतील दिव्यांग बांधवांना दि १३ जाने बुधवार रोजी सकाळी १०:३० वाजता पाच टक्के निधीच्या धनादेशाचे वितरण खानापुर ग्रामपंचायत मध्ये सरपंच शंकरराव आबुज व ग्रामसेवक एन.के.देशमाने यांच्या हस्ते लाभार्थी आंबादास कांबळे,ज्ञानोबा कांबळे,विजय भिसे व लक्ष्मीबाई घोडके यांना वितरित करण्यात आले, तसेच याच कार्यक्रमात माजलगाव मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार पत्रकार तुकाराम येवले यांना जाहीर झाल्याबद्दल व उदगीर ( जि.लातुर ) पत्रकार संघाचा मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट वार्ता पुरस्कार ज्योतिराम पाढंरपोटे यांना जाहीर झाल्या बद्दल खानापुर ग्रामपंचायतीच्या वतिने सरपंच शंकरराव आबुज ग्रामपंचायत सदस्य मुक्तीराम आबुज यांनी सत्कार करुन सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक सुनील खंडागळे,पत्रकार वाजेद पठाण,पत्रकार बाळासाहेब आडागळे,पत्रकार विष्णु उगले,उपसरपंच नानासाहेब घोडके, पोलीस पाटील महादेव कांबळे व शिपाई तुकाराम कांबळे यांची उपस्थिती होती.

COMMENTS