नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार
सर्वधर्मसमभावाचे प्रतीक समजले जाणाऱ्या शिर्डी साईबाबा प्रती स्वरूपात श्री साईबाबांच्या मूर्ती स्थापन व कलशारोहण वर्धापन सोहळा नायगांव येथील साई मंदिरात विविध कार्यक्रमात थाटात संपन्न झाला येथील पानसरे नगरीतील शिर्डी प्रति स्वरूप समजले जाणाऱ्या श्री साईबाबांच्या मंदिरामध्ये मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रम दररोज पहाटे काकड आरती साईबाबांचे मंगलस्नान सकाळी आठ वाजता आरती साई सच्चरित्र पारायण दुपार ती तसेच सोहळ्याच्या मुख्य दिवशी पहाटे सहा वाजता 108 महाकाली अभिषेक पूजा सपत्नीक तसेच आरती प्रसाद दहा ते एक प्रसिद्ध कीर्तनकार विक्रम महाराज नांदेडकर यांचे भक्तिमय वातावरणात भाविकांना भारून टाकणारे ज्ञानेश्वराचे चरित्र व साईबाबा चरित्र व्याख्यान झाल्यानंतर दुपारी एक वाजता महाआरती व नंतर भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे नगरसेवक आनंदराव पा . चव्हाण, माजी जि प सदस्य माधव आप्पा बेळगे, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय पा. चव्हाण डॉक्टर विश्वास चव्हाण, रवींद्र पा. चव्हाण, प्रल्हाद पाटील बोमनाळे,बाळासाहेब पांङे पांडुरंग पा. चव्हाण ,दत्तात्रय लोकमनवार गजानन चौधरी, सचिन चिद्रावार ,साईनाथ वट्टमवार, धनंजय कवटीकवार, पवन गादेवार ,आशिष मामीडवार दशरथ बच्चेवार, लक्ष्मीकांत बच्चेवार, संतोष बच्चेवार, दत्तामामा येवते, शंकर मामा गोटलावार, मंदिराचे पुजारी साईनाथ महाराज, सुभाष चलावार , आदी सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS