केज - प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे लाडेगाव येथील वसुंधरा माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिवश्री शंकरराव सुरवसे तर प्रमुख पाहुणे शिवश्री व्याख्याते मधुकरराव मुळे , शिवश्री शिवाजी गिरी , शिवश्री अंकुशराव सिरसट , आदर्श शिक्षक शिवश्री नरहरी काकडे , शिवश्री बळीराम गाटे , श्रीमती छाया राऊत इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते .
आदर्श शिक्षक शिवश्री नरहरी काकडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त मनोगत व्यक्त करतांना ते असे म्हणतात की ,
'' भोसल्यांची सून तू , जाधवांची लेक जिजाई शोभली जगती माता नंबर एक , माता नंबर एक . "
अखंड भारत देशाचे दैवत आणि मराठी रयतेच्या गळ्यातील ताईत . " ज्यांनी सर्वांचा जागविला स्वाभिमान ज्यांचा आहे सर्वांना अभिमान , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या विषयी सांगणार आहे .
राष्ट्रमाता , राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडा राजा येथे जाधव घराण्यात झाला . त्यांच्या वडीलांचे नाव लखुजी तर आईचे नाव म्हाळसाबाई होते . राजमाता पहिल्या पासून शूरवीर आणि धाडसी होत्या . त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला . त्यांना शिवाजी महाराजा सारखे पुत्ररत्न प्राप्त झाले .
बालपणी त्या शिवरायांना महाभारत , रामायण , कृष्ण -अर्जुनाच्या गोष्टी सांगायच्या शिवरायांना पण वाटायचे आपणही यांच्यासारखे शूर व्हावे आणि आपल्या मराठी रयतेला परकीयांच्या गुलामीतून मुक्त करावे . त्यांच्यासाठी स्वराज्य स्थापन करावे .
तरूण वयातच शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी घोडदौड चालू केली पण, हे कार्य काही सोपे नव्हते . कारण निजाम व मोगलांना विरोध करणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूशी लढणे . पण जिजामातेच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली शिवरायांनी मोठमोठी संकटे पार केली . मग अफजलखानाचा वध असेल किंवा शाहिस्तेखानाची फजिती व इतर अनेक प्रसंग या संकटावर मात करून शिवरायांनी मराठी रयतेच्या रक्षणासाठी हिंदवी स्वराज्य स्थापिले .
यामध्ये राजमाता जिजाऊ यांचा फार मोठा सहभाग आहे . कारण त्यांच्याच पुण्याईने हे स्वराज्य स्थापन झाले .
" आई जिजाई जिजाई तुझीच गं पुण्याई I
ज्याने रक्षिले महाराष्ट्राला त्याला तू घडविले आई " ॥
ज्यांनी महाराष्ट्राला रक्षिले त्याशिवरायांना घडविण्याचे काम जिजामाता यांनी केले . म्हणूनच त्यांचे आपल्यावर खूप खूप उपकार आहेत .
अशा या शूरवीर धाडसी शिवरायांच्या मार्गदर्शक राजमाता जिजाऊ यांचे निधन 17 जून 1674 रोजी झाले . आणि अखंड महाराष्ट्राला आपल्या छत्रछायेत ठेवणारा राजा शिवराय मायेच्या छायेला .परका झाला . आणि सर्व महाराष्ट्र दुःख सागरात बुडाला .
शेवटी एवढेच म्हणावे वाटते .
" जिजाई तू दिलेले संस्कार चंद्र - सूर्य असेपर्यंत मिटणार नाही ."
या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या .विषयी सखोल मार्गदर्शन केले . शिवश्री अंकुशराव सिरसट , शिवश्री शिवाजीराव गिरी तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव सुरवसे अध्यक्षीय समारोप केला . तर काही विद्यार्थी , विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवश्री मधुकरराव मुळे यांनी केले , तर आभार वैष्णवी अंबाड व आयशा शेख या विद्यार्थीनींनी मानले .

COMMENTS