नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
महिला बचत गटाचे जाळे गावा गावात पोहोचली आहे . बचतगटांना बळ देण्यासाठी सर्कल वर प्रभाग संघ स्थापन करण्याची शासनाने संकल्पना आणली आहे.महिलांना आर्थिक साक्षरता आणि स्वावलंबी व्हावे यासाठी बचत गटांची चळवळीची सुरुवात झाली.सहज उपलब्ध कर्ज पुरवठा आणि कमी व्याजदरात मिळणारे कर्ज यामुळे बचतगटाची चळवळ वाढत गेली.
शासनाने बचत गटांना पाठबळ देण्यासाठी गावस्तरावर ग्रामंसंघाची स्थापन करण्यात आली.या ग्राम संघांत गावातील सर्व एकुण 20 ते 25 बचत गटांना समावेश करण्यात आला. ग्राम संघांना पहिल्या टप्प्यात 75 हजार रुपये समुदाय गुंतवणूक निधी दिला जातो.त्यानंतर 3 लाख रुपयाची समुह गुंतवणूक निधी पुरविला जातो.संघाना व्हिआर एफ निधी उपलब्ध करून दिलं जातं. या दहा गावातील ग्रामंसंघाना एकत्र करून सर्कल वर प्रभाग संघ स्थापन करण्यात येणार आहे. बरबडा जिल्हा परिषद सर्कल मधील 10 गावातील दहा ते पंधरा ग्राम संघ एकत्र करून प्रभाग संघ स्थापन करण्यात आले आहे. पाटोदा, अंतरगाव,मनुर,वंजारवाडी,रुई बु,कहाळा,मांडणी,कृष्णूर,सावरखेड,हिपपरगा,घुंगराळा,टाकळी वजीरगाव,या गावात चा समावेश आहे. प्रतेक ग्राम संघांचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष,लीपीका यांनी मिळुन समिती स्थापन करण्यात आली आहे.या प्रभाग संघ ची बरबडा सर्कल मधील सर्व गटावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.बचत गटाचे कामकाज कसे चालते, उद्योग व्यवसाय यांवर मार्गदर्शन माहिती देखरेख राहणार आहे. नायगाव पंचायत समिती अंतर्गत बरबडा येथे उमेद प्रभाग संघ स्थापन करण्यात आल्याची माहिती अमोल जोंधळे यांनी दिली आहे. यावेळी प्रभाकर फांजेवाड गटविकास अधिकारी प.स. नायगांव,माधव केंद्रे, अमोल जोंधळे तालुका अभियान व्यवस्थापक, तुकाराम देवकांबळे नायगांव ,बचत गटाचे 50 ते 60 महिला उपस्थित होत्या.


COMMENTS